'पंकजाताईंचा जुमलेनामा' बीडमध्ये दाखल प्रस्थापितांकडून होतेय बीडकरांची दिशा'भूल'-बीड शहर बचाव मंच

 'पंकजाताईंचा जुमलेनामा' बीडमध्ये दाखल प्रस्थापितांकडून होतेय बीडकरांची दिशा'भूल'-बीड शहर बचाव मंच 

 ताई आता तुम्हाला बीडची परळी' करायची आहे काय...? बीड करांना नीट जगू द्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे 

 रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही हाय प्रोफाईल लोकं कसे सोडवणार आहात..?

.भ्रष्टाचाराचा महामेरू असलेल्या प्रस्थापितांकडून बीडकरांवर भुलतंत्राचा' वापर..
पूर्ण मुस्लिम समाज ही दिशाभूलित व दिशाहीन.
बीड प्रतिनिधी -: आदरणीय मोदीजींनी 100 स्मार्ट सिटीज देशामध्ये निर्माण करणार असा जुमलेनामा दिला होता. आज पर्यंत कधीच पूर्ण होऊ शकला नाही. एक स्मार्ट सिटी सुद्धा देशात करता आली नाही. आ. कै. दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यापासून आपण बाबांच्या नावाचा पुरेपूर वापर करून राजकारणामध्ये आहात. तुमचे स्वकर्तृत्व शून्य आहे. व्हिजन- विकास या सर्व गोष्टींचा आपलाशी लाखो किलोमीटर दूरून सुद्धा संबंध येत नाही. बाबांनी उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव तुमच्या हातुन झाला एवढ्या तुम्ही यशस्वी आहात. कारखाना कर्जबाजारी करून खाऊन टाकलात. बीड कधी एकेकाळी बीड जिल्ह्याची शान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना आपण विकून मोकळ्या झालात हे तुमचं व्हिजन आहे. ताई, नुकताच बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये तुमचा पराभव झाला त्यातच बीड विधानसभा क्षेत्रातून लोकसभेला तुम्ही 65 हजार मतांनी मागे राहिलात. ताई विकास- व्हिजन ह्या गोष्टींशी तुमचा काही संबंध नाही, बाबांच्या नावावर राजकारण करणं मत मिळवणं ही एक वेगळी बाब आहे. तसेच विकास, व्हीजन, कर्मयोगी होणं सगळ्या वेगळ्या बाबी आहेत या सगळ्या बाबींशी तुमचा संबंध आला आहे काय..?? विकास व्हिजन वगैरे तुमच्या तोंडून शोभत नाही. बाबा गेल्यापासून तुम्ही सत्तेत आहात... 2009 पासून आमदार होतात. तुम्ही भारतात, महाराष्ट्रात, बीड जिल्ह्यात, परळीत, कधी- कुठे मोठी विकास कामे केली आहेत आणि मोठे प्रकल्प उभे केले आहेत ते सर्व बीड करांना पाहायला यायचे आहे. कृपया आमच्या बीडकर जनतेला याचा पत्ता व इतंभूत माहिती कळवावी. क्षीरसागरांसारख्या महाचोरांना पाठीशी घालून व त्यांची सर्व पापे पाठीशी घालून असं कोणतं मोठं व्हिजन तुमच्यात निर्माण झाल आहे हेच आम्हाला कळत नाही. आदरणीय ताई आमच्या बीडला तरी सोडा..., तुमचा विकास, तुमचा कर्मयोग सर्व महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित आहे. तुमचं बीड जिल्ह्यातलं राजकारण हे बाबांच्या नावावरच 'लाडं लाडं' राजकारण आहे. विकास व्हिजन या गोष्टींची तुमचा स्वप्नातही कधी संबंध आलेला नाही. मग क्षीरसागरां सारख्या महाचोरांना सोबत घेऊन बीड लुटण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे काय.? तुमच्या परळीचा रोल मॉडेल पूर्ण देशासमोर आहे... आता तुम्ही बीडची परळी करायचं ठरवलं आहे काय...?
  खुद्द दिल्लीकरांनीच आमचे नेते केजरीवाल' यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळेस भाजपचा सुपडा साफ केला होता. होऊ घातलेल्या 2025 नगरपरिषद बीडच्या निवडणुकीत प्रचार प्रक्रियेत प्रस्थापितांकडून सामान्य जनतेची दिशाभूल केल्या जात आहे. गेल्या 40 वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या बीडच्या जनतेला या निवडणूक प्रचार प्रक्रियेत भूलतंत्राचा वापर करून दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेमध्ये अलटून पलटून सहभागी होणारे व महायुती म्हणून राज्यात सरकारमध्ये एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्व नियोजन करून वेगवेगळ्या लढावायच्या, त्यांनीच मुस्लिम समाजाची दिशाभूल करून व भूलतंत्राचा वापर करून मुस्लिम बांधवांना अलगाववादी करायचे,आम्ही मुस्लिम समाजाला तिकिटे दिली असा यातील एका पक्षाने मोठेपणा निर्माण करायचा, ही सगळी दिशाभूल आणि भुलतंत्रच आहे. अशा पद्धतीने अलगाव आणि भूलतंत्राला बळी पडलेला मुस्लिम समाज स्वतःचा खरोखरच किती विकास करू शकेल हा मोठा प्रश्न आहे..? यातून मुस्लिम समाज भटकेल याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी या नियोजनबद्ध पद्धतीने रचलेल्या अलगाव कटाचे बळी न ठरता नीट विचार करण्याची अत्यंत गरज आहे. तुमच्यासमोर हे जे काही चाललं आहे ते सर्व पूर्वनियोजित व नाट्यमय पद्धतीने चाललेले आहे. सर्व पुरोगामी व डाव्या विचारसरणीच्या लोकांना विभक्त करून जातीयवादाचे विष नवीन पिढीमध्ये व सर्व जनतेमध्ये पेरायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेऊन सत्तेत यायचे कारस्थान सुव्यवस्थित पद्धतीने चालू आहे. सामान्य जनतेने जागृत होण्याची खूप गरज आहे. मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुरोगामी व डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन विचार मंथन करण्याची अत्यंत गरज आहे. 
2022 मधील नगरपालिकेच्या निवडणुका नाट्यमय रित्या पुढे ढकलल्या गेल्या. सरकारनेही लोकशाहीला काळीमा फासली. निवडणुका घ्यायची मनस्थिती महायुती सरकारची राहिलेली नव्हती. पर्यायाने प्रशासकीय कारभार महाराष्ट्रात चालू झाला. सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला. प्रशासकीय कारभाराच्या नावाखाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडून लोकप्रतिनिधी, शासन, प्रस्थापित घराणे मनमानी पद्धतीने राज्य करू लागले, राजकारण करू लागले. गेल्या 40 वर्षापासून हक्काच्या विकासापासून वंचित राहिलेली बीडकर जनता फारच त्रस्त झाली आहे. प्रस्थापित घराण्यांच्या मनमानी भ्रष्टाचारी कारभारामुळे बीड शहर भकास झालेले आहे. कुठे गेला 'विकास'..? का झाले बीड शहर भकास..? याची अनेक सुज्ञ लोक कारणे शोधत आहेत. भ्रष्टाचार करण्यासाठी भ्रष्टाचारी व्यवस्था ही निर्माण करावी लागते. हे अक्षम्य पाप प्रस्थापित घराण्यांनी आपल्या बीडमध्ये केलेले आहे. याच काळात बीड शहर बचाव मंचाची स्थापना झाली. शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या सुज्ञ-तज्ञ लोकांना एकत्र आणून कॉम्रेड नितीन जायभाये यांनी बीड शहर बचाव मंचाची स्थापना केली. प्रस्थापित व मनमानी व्यवस्थेला विरोध केला. यातूनच भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विरुद्ध आंदोलनांची मालिका सुरू झाली. मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी 'निता अंधारे यांची बदली असेल, बीड शहरातील जनतेला सतत सहन करावा लागत असलेल्या पाणीटंचाईचा त्रास असेल, शुद्ध पाण्याचा ऐरणीवर आणलेला मुद्दा असेल, शहरातील कचरा सफाईचा मुद्दा असेल, बोगस बिलांचा मुद्दा असेल,शासनाने शेकडो कोटी रुपये निधी देऊन सुरू केलेली अटल अमृत जल योजना, भुयारी गटार योजना या सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केली, याच्या विरुद्ध कॉम्रेड नितीन जायभाये यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. महावितरणच्या अंतर्गत बीड शहरातील अनेक भागांमध्ये प्रलंबित असलेली विजेची कामे असतील,पेठ बीड भाग, तेलगाव नाका, गांधीनगर, सर्व दारूल उलुम मदरसे, बार्शी नाका इमामपुर रोडवर भागातील मजारीस उलूम मदरसे येथे सर्वच ठिकाणी नवीन डिप्या देणे लाईटची नवीन यंत्रणा तयार करण्याची कामे असतील, इस्लामपुरा भागातील विजेच्या प्रश्नांसह रस्ते, नाल्या, नवीन रस्ते, सफाई, इतर अनेक प्रश्न असतील, नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांकडे सातत्याने शहरातील असंख्य समस्या घेऊन, शहरातील सर्वच भागातील नागरिकांना सोबत घेऊन कामांचा पाठपुरावा करत नियमित बैठकांची मालिका असेल, सय्यद अली नगरच्या प्रश्नांवर झालेले मोठे आंदोलन असेल, बीड शहर बचाव मंचाच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी धानोरा रोड भागांमध्ये केलेले मोठे आंदोलन असेल, जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने निवेदने बैठका, गतकाळामध्ये शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी झालेले रस्त्यांच्या कामांना प्रस्तावित करणे,त्याचे सातत्याने पाठपुरावे, शहरातील पथदिव्यांसाठी लागणाऱ्या बजेटची वारंवार मागणी व पाठपुरावा त्यानंतर एक वर्षाच्या बजेटला मिळालेली यश, क्रिकेट व फुटबॉल खेळणाऱ्या सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी स्टेडियम बचाव आंदोलन, फलटण येथे दुर्दैवी निघृण हत्या झालेल्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्यासाठी उभे केलेले आंदोलन- मोर्चे असतील, नगर रोड भागातील यु'टर्न साठी झालेली आंदोलने, सातत्याने जनतेच्या समस्यांसाठी झालेल्या आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग... पावसाळापूर्व तयारीची निवेदने-आंदोलने, शहराला आवश्यक असलेल्या घंटा गाड्यांसाठी प्रदीर्घ दोन वर्षाची लढाई व त्यानंतर आलेले यश, व आता 2025 च्या निवडणुकीच्या माध्यमातून बीड नगरपरिषद ही रोल मॉडेल' व्हावी, विकासासाठी लागणारी एक दूरदृष्टी , व त्यासाठी लागणारे विजन, विकासासाठी लागणारी कारभारातील पारदर्शकता, सार्वजनिकता या सर्व गोष्टींचा आग्रह धरत बीड शहर बचाव मंच व मंचाने स्थापित केलेली 'अतहर बाबर शहर विकास आघाडी' व आदरणीय मरहूम अतहर बाबर यांचे स्मरण करून यांच्या विचारावर चालण्यासाठी घातलेला घाट व आग्रह. सर्व गोष्टींमधून आम आदमी पार्टीच्या झाडू या चिन्हावर सौ. वृषालीताई नितिन जायभाये यांना बीड नगरपालिकेच्या सक्षम भावी नगराध्यक्ष पदाच्या 'जनतेच्या' उमेदवार म्हणून उभे करण्यात आलेले आहे. या माध्यमातून आता बीड शहराला मिळणार आहे एक निर्भीड नेतृत्व. 'विकास आणि विकासच' या मुद्द्यावर भावी नगराध्यक्षा ठाम आहेत. बीड शहराच्या विकासासाठी कसलीही तडजोडच नाही, हाच आमचा विकासाचा अजेंडा.... बीड शहराचा विकास हीच आमची प्रेरणा हीच आमची स्फूर्ती..आता फक्त एकच स्वप्न बीड शहर स्वच्छ सुंदर शहर, शहराचा सर्वांगीण विकास करून एक समृद्ध बीड शहराची निर्मिती .... हेच आमचे ध्येय, हेच आमचे उद्दिष्ट, हेच आमचे व्हिजन, बीड शहराच्या आणि बीडकरांच्या विकासासाठी तडजोड नाहीच. तरी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या होणाऱ्या मतदान प्रक्रियाद्वारे या निवडणुकीमध्ये बीड शहरातील माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम आदमी पार्टीच्या 'झाडू' या चिन्हावरील अधिकृत उमेदवार सौ वृशालीताई नितीन जायभाये यांना प्रचंड बहुमताने विजयी करून बीड शहराचा चेहरा बदलून टाकण्यासाठी व विकासासाठी मत द्यावे हे विनम्र आवाहन.'

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी