आष्टीआतालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ,वन विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करावे- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक (भैय्या) गरुड
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले असून आष्टी वन विभागाने तात्काळ बिबट्यासाठी पिंजरा लावून कैद करावे अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक (भैय्या) गरुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .
पुढे सांगितले की , एकीकडे बिबट्याची दररोज संख्या वाढत असून दुसरीकडे वनविभागाची उदासीन भूमिका पहावयास मिळत आहे .
तालुक्यातील अनेक शेतकरी/ शेतमजूर सध्या शेतात काम करताना दिसत असून दररोज बिबट्या आला गेल्याच्या चर्चा ऐकव्यास मिळत असून यामध्ये शेतकरी/ शेतमजूर भयभीत झाले असून बिबट्या केव्हाही मनुष्य प्राण्यावर हल्ला करू शकतो हे वन विभागाने नाकारू नये .
शेतकरी/ शेतमजूर /नागरिक कामा निमित्ताने गेलेले उशिरा का होईना कामा वरुन ये - जा चालु असते. आष्टी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहुल सावधानता बाळगावी अशी विनंती केली असून सध्या वाघुळुज/ पठार भाग/ कुंभारवाडी/ दौलावडगाव /सुलेमान देवळा/
पाटण सांगवी, आदी भागात बिबट्या आला गेल्याच्या चर्चा चालू असून या चर्चेने अनेक नागरिक /माता /भगिनी लहान मुले भयभीत झाले आहेत .
सुलेमान देवळा या भागात गेल्या अनेक दिवसापासून दोन बिबटे कायम मुक्कामी असल्याचे समजले असून सुद्धा वनविभाग गाढ झोपेत असल्याचे समजते. बिबट्या नर भक्षक होऊन नागरिकांच्या मृत्यूची आष्टी वन विभाग वाट तर पाहत नाही ना ? असा संतापजनक सवाल आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक (भैय्या) गरुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला .
Comments
Post a Comment