मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :- (दि. २०) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याच्या भीषण घटनने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवार, दि. २० रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली.

निदर्शनाच्या सुरुवातीला स्व. यज्ञा दुसाने या चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी “आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, “बलात्कार्यांना कायद्याची भीती निर्माण करा” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी

खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवावा

सर्व सहआरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत द्यावी

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घ्यावी


हे निवेदन बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

या निदर्शनात राजेभाऊ जाधव,बाळासाहेब,सरपंच बालासाहेब जाधव, पत्रकार हरिओम क्षीरसागर,उपसरपंच बाळकृष्ण थोरात,शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील मोरे, सर्पमित्र अशोक जाधव,विनायक वाणी, श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात,अँड.गणेश वाणी, शिवाजी वाणी,दादा वाणी,शहादेव कोल्हे, रामकिसन गिरे, रुपचंद गव्हाणे, चोखोबा निर्मळ, अशोक दाभाडे, नरहरी ढवळे, अंकुश जाधव, विनायक मोरे , रफीक सय्यद, अकबर सय्यद,शहादेव ढास आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी