बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अमरसिंग ढाका यांची बिनविरोध निवड
बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अमरसिंग ढाका यांची बिनविरोध निवड
उपाध्यक्षपदी किरण सावंत तर सचिव पदी नितीन आमटे यांची बिनविरोध निवड
बीड प्रतिनिधी :- बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड संस्थेच्या संचालक मंडळातून उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संचालक मंडळाची सभा दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड या संस्थेच्या संचालक मंडळातून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करण्यासाठी मुख्य पोस्ट ऑफिस येथे सभा घेण्यात आली या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी अमरसिंग ढाका यांचा एकमेव अर्ज आला व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली ते या अगोदर सचिव म्हणून कार्यरत होते.तसेच उपाध्यक्ष पदासाठी ही किरण सावंत यांचा व सचिव पदासाठी नितीन आमटे यांचाही एकमेव अर्ज आला व तिघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते त्यामध्ये,सहकारी संस्था चे अध्याशी अधिकारी म्हणून श्री रामचंद्र ठोसर साहेब व सोबतीला श्री सिद्धेश्वर सांगुळे हे हजर होते. श्री विष्णू किसन वीर, धनंजय शेंडगे, भारत भूषण वारंगुळे, विशाल घोरड, सुबोध कांबळे, सत्य कुमार कुलथे, दत्तात्रेय गाडेकर, श्रीमती अनिता क्षीरसागर व प्रतीक्षा तवरे हे सर्व संचालक उपस्थित होते व संविधान वीर व शिवाजी पवार हे कर्मचारी हजर होते.
Comments
Post a Comment