निवडणुक रणधुमाळीच्या तोंडावर आमदार सुरेश धस यांची कट्टर समर्थक योगेश सानप यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना उधाण
पाटोदा (गणेश शेवाळे)अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आले असताना आष्टी- पाटोदा-शिरूर मतदारसंघात महत्त्वाची घडामोड घडली भाजपचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांनी आपल्या कट्टर समर्थक आणि सक्रिय युवा कार्यकर्ते योगेश सानप यांच्या महासांगवी येथील निवासस्थानी भेट दिली असताना संपूर्ण परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट साधी भेट नसून भाजपच्या आगामी रणनीतीशी थेट जोडली जात असल्याचे स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत. पारगाव पंचायत समिती गणात उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये या भेटीमुळे स्थानिक पातळीवरील चर्चा आमदार धस यांनी जर पारगाव पंचायत समिती गणातून
योगेश सानप यांना उमेदवारी दिली, तर गणातील राजकीय मांडणी पूर्णपणे बदलू शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. सानप यांचे तरुणांमध्ये मोठे समर्थन, सक्रिय जनसंपर्क आणि कट्टर कार्यकर्त्यांची साथ यामुळे त्यांचे नाव आघाडीवर येत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. विरोधकांमध्येही या भेटीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असुन या भेटीनंतर पारगाव गणात निवडणुकीचे वातावरण तापले असून, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये पुढील घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपा कोणाला उमेदवारी देणार आणि मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणे कशी बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, आमदार सुरेश धस यांच्या या सदिच्छा भेटीमुळे पारगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
Comments
Post a Comment