धर्मयोद्धा संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
धर्मयोद्धा संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा केला गौरव
इगतपुरी तालुका : हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज संघटितपणे उभा आहे, हे दाखवून देण्यासाठी धर्मयोद्धा संघ, इगतपुरी तालुक्यातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, तसेच पी.आय. मथुरे आणि मगर यांच्या टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गोहत्या थांबविण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे डॉ. रुपेश नाठे यांच्या कार्याचेही ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.
सोहळ्यात ह.भ.प शिवा महाराज अडके यांच्या कीर्तनासह सतीश महाराज, रहाडे महाराज, पुरशोत्तम महाराज आणि राव महाराज यांची पवित्र साथ लाभली. कीर्तनादरम्यान अडके महाराजांनी धर्माचे महत्व स्पष्ट करत निर्भीडपणे गोरक्षणाचा मुद्दा मांडला. धर्मकार्य करताना मानसिक, शारीरिक व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो; तरीही संकटांना न घाबरता कार्य चालू ठेवणारेच खरे धर्मसेवक— आणि त्यापैकी एक नाव म्हणजे रुपेश दादा नाठे, असे त्यांनी गौरवपूर्वक सांगितले. अशा युवकांच्या पाठीशी समाज ठामपणे उभा राहिला, तर धर्मकार्यात अडथळे निर्माण होणार नाहीत, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. रुपेश नाठे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे ‘मी तुझ्या पाठीशी आहे’ हे शब्द मला बळ देतात. माझे वडील हरिश्चंद्र नाठे यांच्या संस्कारांमुळेच हे कार्य शक्य झाले.” त्यांनी मालेगाव येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध व्यक्त करत, न्याय मिळेपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच रोहीदास कातोरे, बानेश्वर मालुंजकर, रोहीदास टिळे, अंबादास कालेकर, दिलीप शेजवळ, मदन गवळी, दत्ता मालुंजकर, ज्ञानेश्वर मालुंजकर, ज्ञानेश्वर कातोरे, किरण कातोरे, संतोष भाडमुखे, सागर कातोरे, भावड्या मालुंजकर, योगेश मालुंजकर, धनाजी कोतोरे, दिपक शेजवळ, संतोष राजोळे, प्रकाश मालुंजकर, संतोष मुतडक, हिरामण कातोरे, पांडुरंग जाधव भजनी मंडळी बाबाजी भक्त परिवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
Comments
Post a Comment