शिरूर कासार येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना(ठाकरे )पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शिरूर कासार येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
आष्टी (प्रतिनिधी- गोरख मोरे ) :
शिरूर कासार( जिल्हा बीड) शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक आणि कोळवाडी चौकापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने सर्व सामान्य नागरिक /व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असुन या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडुन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे .या मध्ये दमा /श्वसनासंबंधी आजार वाढल्याचे निदर्शनास आले .तर दुसरीकडे या धुळीमुळे सर्व सामान्य छोटे-मोठे व्यापाऱ्यांच्या मालाचेही नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले .
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरुर कासार तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर आदी कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार शिरूर कासार यांना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनात संबंधित रस्त्यावर सकाळी १० वाजता आणि दुपारी ४ वाजता दिवसातून दोन वेळा टँकरद्वारे पाणी मारून धूळ नियंत्रण करण्याची मागणी देखील करण्यात आली असून जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक आणि कोळवाडी चौक ते बीड रोड या मार्गावर तत्काळ सिमेंट किंवा डांबरी रस्ता करण्याची मागणी करण्यात आली.
संबंधित प्रशासनाने तात्काळ निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना न केल्यास १ डिसेंबर २०२५ रोजी शिरूर शहरातील जिजामाता चौकामध्ये सकाळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही शिवसेनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला . या बाबीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी आंदोलकांनी केली .
Comments
Post a Comment