शिरूर कासार शहर / ग्रामीण भागात पूर्ण दिवस उच्च दाबाचा वीज पुरवठा सुरू ठेवा-मोरे / खेडकर


आष्टी (प्रतिनिधी- गोरख मोरे)
       शिरूर कासार तालुक्यातील गेल्या एक ते दोन महिन्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांना बिबट्या दिसून येत असल्याचे शेतकरी वर्गाकडून समजले. परंतु वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या बाबत काही एक नागरिकांना योग्य ती माहिती दिली नाही , त्यामुळे वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत रात्रीच्या वेळी ग्रस्त घालने आवश्यक असुन शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या हरभरा/ गहू /ज्वारी आदी पीकासह , भाजीपाला यासारखे पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी वर्ग करत असून ाशेतकऱ्यांना शेतीमध्ये रात्रीचे पिकाला पाणी देण्यासाठी बिबट्याची दहशत झाल्याने भय निर्माण झाले असून शिरूर कासार शहरांमध्ये अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे जळू लागल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने 
 तहसीलदार साहेबांना विनंती करण्यात येते की , शिरूर कासार शहरात / ग्रामीण भागात पूर्ण दिवस उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे , नसता शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून या बाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी ही नोंद घेण्यात यावी असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर याच्या सह शिवसेनेचे अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख लालाभाई पठाण , युवा सेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ ढाकणे , हरी मामा खेडकर, संजय सानप , कलीम भाऊ सह संघटक कोकणे साहेब व सर्व शिवसैनिकांना शेतकरी बांधवांना सोबत घेऊनच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही , जीवित हानी नको ही तर खरं वन विभागाची जबाबदारी असल्याने त्यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून शेतकरी बांधवांना मदत करावी असे शिरूर कासार शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ( भाऊ ) खेडकर यांनी शिरूर कासार तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात सांगितले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी