लोकनेते बाबुरावजी जोगदंड यांच्या पाठीशी युवकांची फौज उभी करू :- विवेक कुचेकर
(चौसाळा प्रतिनिधी) :- चौसाळा हे शहर ग्रामीण भाग असले तरी या पंचक्रोशीतील सर्व जाती, धर्म, पंथ, आणी समुदाया च्या नागरिकांसाठी दिलदार मनाचा राजा म्हणून लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड यांचे नाव अग्रक्रमाने प्रथम येते. या नावाला वलयं आहे तो सामाजिक कार्याचा, सामाजिक भानाचा, अडल्या नडल्याचा, दुःखीतांचा, शोषित, वंचितांचा, समाजा समाजात मानव हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे ही उदात्त भावना पेरणाऱ्या बाबुरावजी जोगदंड या लोकनेत्याचा. बाबुरावजी जोगदंड हे व्यक्तीमत्व म्हणजे चौसाळा गणातले निःस्वार्थ समाजकार्य करणारे महामेरू पर्वत आहेत. असा लोकनेता आम्हा चौसाळकर नागरिकांसाठी जिल्हा परिषद गणातुन आमच्या हक्काचा उमेदवार म्हणून मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये असावा अशी आम्हा सर्वांची लोकभावना आहे. असे मत बाबुरावजी जोगदंड यांचे खंदे समर्थक समजले जाणाऱ्या विवेक कुचेकर यांनी व्यक्त केले आहे. मागील गेल्या सतरा वर्षापासुन युवा कार्येकर्ते विवेक कुचेकर यांचा सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग असुन,दलीत आदीवासी,भटके विमुक्त, ओबीसी समाजासह प्रत्येक जाती धर्मातील युवकाची फलटण विवेक कुचेकर या तरुण निस्वार्थी कार्येकर्त्याच्या मागे उभी आहे आगामी काळात डॉ. बाबुरावजी जोगदंड यांना याचा मोठा फायदा होणार असुन आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व विवेक कुचेकर हे निस्वार्थी पणे डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.चौसाळा पंचक्रोशीत विवेक कुचेकर हे नाव म्हटले की सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणुन ओळखले जाते चोसाळा शहरातील व सर्कल मधील प्रत्येक जाती धर्माचा माणुस या युवाकार्यकर्त्याकडे हक्काने येवुन आपले प्रश्न मांडतो व तो प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न विवेक कुचेकर हा युवा कार्येकर्ता करतो आहे. गेल्या पधरावर्षापासुन सामाजिक क्षेञाबरोबरच पञकारिता क्षेत्रात सुद्धा विवेक कुचेकर या तरुणाचा मोठा वाटा असुन सध्या तो चौसाळा पञकार संघाचा अध्यक्ष असुन विविध सामाजिक क्षेञातील पुरस्काराने त्याला सन्मानित देखील करण्यात आलेले आहे.विवेक कुचेकर सारखा युवा कार्यकर्ता डॉ. बाबुरावजी जोगदंड यांच्या पाठीशी समर्थपणे उभा असुन युवकाची मोठी फलटण उभी असल्यामुळे विरोधकाच्या गोटात खळबळ माजली आहे जि. परिषद गणातून बाबुरावजी जोगदंड यांना आम्हा चौसाळकरांचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली जावी. बाबुरावजी जोगदंड यांच्या साठी युवकांची फौज उभी करून आमच्या चौसाळकरांचे बाबुरावजी जोगदंड यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचे स्वप्न पूर्ण करू असे प्रतिपादन युवा कार्येकर्ते विवेक कुचेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment