सप्तशृंगी गड वनी ते वेळापूर 120 किलोमीटर आंतरावरुन् अवघ्या पाच तासात पायी चालत मशाल ज्योत
कोपरगाव तालुक्यातील वेळापुर् या गावच्या आदिवासी बांधवांनी सप्तशृंगी गड वनी ते वेळापूर 120 किलोमीटर आंतरावरुन् अवघ्या पाच तासात पायी चालत मशाल ज्योत आणली
सालाबाद प्रमाणे कोरोना काळाच्या दोन वर्षातील कालखंडा नंतर या वर्षी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर या गावच्या आदिवासी तरुणांनी सप्तशृंगी गडावरून ज्योत आणून शारदीय नवरात्र उत्सव कार्यक्रम हा सुरू केला.तालुक्यातून वेळापूर गावच्या या आदिवासी बांधवांचे कौतुक केले जात आहे त्यावेळेस एकलव्य महाराष्ट्र आदिवासी परिषद तालुकाध्यक्ष कैलास भाऊ पवार यांनी आपल्या बांधवांनी ही संस्कृती कायम अशीच चालू ठेवावी असे मनोगत व्यक्त करून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी कैलास ठाकरे विलास ठाकरे केतन पवार सचिन पवार गणपत पवार सतीश पवार भाऊराव पवार नवनाथ भाऊ पिंटू भाऊ वाघ व सर्व आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या
Comments
Post a Comment