क्षीरसागरांना कंटाळून मिल्लत नगर भागातील सय्यद अरबाजसह अनेक तरुणांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश


 आगामी नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम बांधव परिवर्तन घडवून स्व.मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतील-रामहरी मेटे

 मुस्लिम तरुणांना साद देत क्षीरसागर मुक्त बीड शहराचे स्वप्न पूर्ण करणार -रामहरी मेटे


 बीड (वार्ताहर) बीड शहरातील मिल्लत नगर येथील अनेक तरुणांनी शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर प्रवेश केला.बीड नगरपालिकेतील सत्ताधारी योगेश क्षीरसागर यांचे खंदे समर्थक असणारे सय्यद अरबाज सय्यद खमर व मिल्लत नगर मधील अनेक मुस्लिम तरुणांनी शिवसंग्राम भवन बीड येथे प्रवेश केला .
     
             शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बीड शहरातील मिल्लत नगर येथील सय्यद अरबाज सय्यद खमर सहित , सय्यद अरबाज , शेख शाहरुख, अबरार कुरेशी, आलम खाँन , सय्यद शहाबाज , कुरेशीजी शान मुसावीर कुरेशी, रिजवान कुरेशी आदी असंख्य युवकांना प्रवेश संपन्न झाला.स्व.विनायकरावजी मेटे साहेबांच्या अपघाती निधनानंतर मेटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला यातून स्वतःला सावरत व शिवसंग्राम मधील सर्व मावळ्यांना आधार देत संघटनेच्या माध्यमातून गोर-गरिबांचे , वंचित, उपेक्षितांचे प्रश्न सोडवावेत हा स्वर्गीय साहेबांचा उद्देश होता . तो उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वतः रामहरी भैया मेटे सक्रिय झाले. तसेच स्वर्गीय साहेबांनी छत्रपती शिवरायांना आदर्श मानून ज्या पद्धतीने सर्व अठरापगड जाती धर्माचे मावळे एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं तोच आदर्श समोर ठेवून शिवसंग्राम वंचित -उपेक्षित , गोरगरीब, विस्थापित जनतेला एकत्रित करून विविध प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेची क्रियाशीलता दिसून येते . विशेष करून स्वर्गीय मेटे साहेबांनी मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्ना संदर्भात विधानभवनात आवाज उठवला . तसेच जोपर्यंत मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गरीब मुस्लिम बांधवांना शैक्षणिक सोयी -सवलती मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला . त्याच पद्धतीने बीड शहरातील अनेक भागांमध्ये मुस्लिम भागातील रस्ते व्यवस्थित नव्हते त्यावेळी तेथे त्यांना रस्ते मंजूर करून दिले . पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्यावेळी 36 पैकी 25 बोअरवेल फक्त मुस्लिम भागामध्ये स्वर्गीय मेटे साहेबांनी घेतले होते व पाणी प्रश्न सोडवला . त्याच प्रकारे मुस्लिम भागांमध्ये तीन कोटीची कामे देऊन विकासाला गती देण्याचे काम स्वर्गीय मेटे साहेबांनी केलं. याच पद्धतीने मुस्लिम बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसंग्राम आग्रही असेल अशी ग्वाही रामहरी भैया मेटे व शिवसंग्रामच्या वतीने देण्यात आली .स्वर्गीय मेटे साहेबांचे सत्ता परिवर्तनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठीचा एक भाग म्हणून आज अनेक मुस्लिम बांधवांनी शिवसंग्राम मध्ये जाहिर प्रवेश केला असे मत रामहरी भैया मेटे यांनी व्यक्त केले .
     या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसंग्राम नेते सलमान अली यांनी केले . तसेच सूत्रसंचालन अल्पसंख्यांकाचे ज्येष्ठ नेते शेख कुतुबभाई यांनी केले . सय्यद सलमान अली यांनी प्रस्तावित करताना स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवांच्या समस्येबाबत वेळोवेळी आवाज उठवला असे मत व्यक्त केले. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न तसेच शैक्षणिक सवलती बाबत विधानभवनामध्ये अनेक वेळा आवाज उठवला व मुस्लिम बांधवांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शैक्षणिक सवलती मिळाव्यात ही आग्रही भूमिका मांडली . तसेच बीड शहरातील अनेक मुस्लिम भागामध्ये रस्ते , नाल्या, अस्वच्छता ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, राशन अशा अनेक छोट्या - छोट्या प्रश्न स्वर्गीय मेटे साहेबांनी मार्गी लावले .म्हणून खऱ्या अर्थाने बीड शहरातील संपूर्ण मुस्लिम समाज स्वर्गीय मेटे साहेबांना आपला आदर्श मानतो आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय मेटे साहेबांचे स्वप्न होते की सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय विकास करता येत नाही म्हणून सर्व मुस्लिम बांधव शिवसंग्रामच्या खंबीरपणे पाठीशी राहून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण साथ देऊन सत्ता परिवर्तन करेल व स्वर्गीय साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल असे आपल्या प्रास्ताविकात म्हटले. त्यानंतर शिवसंग्रामचे सचिव अनिल घुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसंग्राम ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी एकमेव संघटना असून आज अरबाजने अनेक युवकासह शिवसंग्रामध्ये प्रवेश केला तर संपूर्ण ताकद त्याच्या पाठीशी उभी केली जाईल व भविष्यात मुस्लिम बांधवासहित असणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसंग्राम आग्रही भूमिका मांडेल असे मत व्यक्त केले . यानंतर शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी अरबाजचे शिवसंग्राम संघटनेमध्ये स्वागत करत मुस्लिम बांधवा संबंधी स्वर्गीय मेटे साहेबांचे विशेष प्रेम होते व वंचित उपेक्षित समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आग्रही भूमिका होती तसेच ठाम भूमिका घेणारे स्वर्गीय साहेब होते असे मत मांडले . यानंतर शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष ॲड. राहुल मस्के यांनी आपल्या मनोगतामध्ये मा.पवारांनी बारामतींचा जसा विकास केला तसीच चाळीस वर्षे निर्विवाद सत्ता क्षीरसागर कडे असताना सुद्धा बीड शहराचा विशेष करून मुस्लिम भागाचा विकास का झाला नाही ? असा प्रश्न मांडला तसेच कोणतेही प्रश्न आपोआप सुटत नसतात यासाठी संघर्ष करावा लागतो . तो संघर्ष करण्यासाठी सर्व मुस्लिम तरुणांनी संघर्षासाठी तयार व्हावे व आपले प्रश्न आपणच सोडवावेत यासाठी सज्ज असायला पाहिजे तसेच त्यासाठी शिवसंग्राम संघटना पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभी राहील अशी वाही दिली .शेवटी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी सर्व युवकांचे शिवसंग्राम मध्ये स्वागत केले व भविष्यात सामाजिक व राजकीय निवडणुकाला सामोरे जाताना शिवसंग्राम पूर्ण ताकतीनिशी आपल्या पाठीशी ठाम उभा राहील आणि अडचणीला धावून येईल. सर्वांनी स्वर्गीय मेटे साहेबांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतः विनायक मेटे समजून कामाला लागावे अशी सूचक वक्तव्य केले.
    याप्रसंगी उपस्थित शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद, शिवसंग्राम नेते तथा युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैय्या मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड.मनिषाताई कुपकर, बीड शहराध्यक्ष ॲड .राहुल मस्के, बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर सचिव गोपीनाथ देशपांडे, सेवा.सह.संय्थेचे चेअरमन अशोकराव घुमरे,अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अमजद पठाण, शहर उपाध्यक्ष शेेषेराव तांबे, युवा नेते मनोज जाधव, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे,अल्पसंख्यांकचेे ज्येष्ठ नेते शेख अखिलभाई, शेख कुतुब भाई, शेख नदीम गणी, शेख जाकीर हुसेन, शेख लालाभाई, शकील खान,स.सलमान अली, शिवसंग्राम नेते हनुमंत पवार, सातीराम ढोले, गोपीनाथ बापू घुमरे, रमेश चव्हाण,विजय सुपेकर मुकुंद अबुज, पांडुरंग आवारे पा,गणेश धोंडरे, हरिश्चंद्र ठोसर, पांडुरंग बहिर, विजय डोके, अशोक लोकरे, अनिल चांदणे, मिलिंद शिंदे, सुमित मोरे , प्रा.पंडीत शेंडगे व अन्य शिवसंग्राम नेते पदाधिकारी व कार्यकर्ते व संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी