शेख शागिर्द अहमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
पाटोदा (गणेश शेवाळे) दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी कॉकसिट कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटना जिल्हा लातूर यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार उस्मानाबाद येथील कर्तव्यदक्ष शिक्षक शेख शागिर्द अहमद (सर)यांना मराठवाडा शिक्षक आमदार श्री.विक्रम काळे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी बीड, नांदेड, लातूर आणि परभणी येथील आदर्श शिक्षकांनाही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रॉयल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पाटील साहेब, मोइज शेख, मिनहाजुद्दिन काझी, फारुक शेख वकिल साहेब, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए.गफ्फार, युनुस अंसारी, एम.ए.राफे सर, डॉक्टर तबस्सुम बाजी, सादात सर, फजल सर, नुसरत कादरी सर व त्यांचे सहकारी शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडी बद्दल शेख शागिर्द अहमद (सर)यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Comments
Post a Comment