रायमोह मंडळातील सोयाबीन २५%पीकविमासाठी मा.विभागीय आयुक्तांकडे ९६० शेतक-यांची निवेदन सादर-शिवराम राऊत.



 

रायमोह मंडळातील शेतक-यावर अन्याय होऊ देणार नाही -सुनिल केद्रेंकर

(शिरूर प्रतिनिधी) ..दि.२६ सप्टेंबर रोजी शिवसंग्राम शिरूर , धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा, श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पोषक फार्मर्स शेतकरी उत्पादक कं, तसेच रायमोह म.मंडळातील हिवरसिंगा, मलकाचीवाडी, औरंगपूर,ढोरकरवाडी,खलापूरी,व इतर सर्व गावातील शेतकरी यांचे अर्ज श्री.शिवराम राऊत चि‌.बाळासाहेब दुधाळ यांनी मा.विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेंकर सर यांची प्रत्यक्ष औरंगाबाद येथे भेटून रायमोह म.मं.सोयाबिन पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५%अग्रीम पीकविमा मिळवून देण्यासाठी ९६० निवेदने सादर केले.

बीड जिल्हा पीकविमा समितीने सोयाबीन पीक २५%अग्रीम विमा मिळण्यापासून रायमोह महसुल मंडळाला वगळण्यात आल्याने मंडळातील सर्व गावातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे.या गावांमधील प्रशासनाने अंदाजे सोयाबीन लागवड जरी १६१४ हे.केली आसली तरीही प्रत्यक्ष सोयाबीन लागवड अधिक प्रमाणात हे.जूलै-ऑगस्ट मधील सलग २० दिवसापेक्षा हि अधिक पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात ६०%पेक्षा अधिक घट होणारी आहे त्यातच सप्टेंबर महिन्यात पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत सततच्या पावसामुळे खरिप हंगामी सोयाबीन, कपाशी, तुर,मुग उडीद,सह सर्व पीके नैसर्गिक आपत्तीच्या सामना करत आहेत.अशा स्थीतीत रायमोह मंडळातील शेतकऱ्यांनी अग्रीम पीकविमा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब विंनती केली तरीही न्याय न मिळाल्याने मंडळातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे निवेदन, मा.विभागीय आयुक्त साहेब औरंगाबाद यांना दिले आहे बीड जिल्हा प्रशासनाने शिरूर तालुक्यातील इतर मंडळे समाविष्ट करण्यात आले आहे.व रायमोह मंडळ वगळले . शेतकऱ्यांना पीकविमा नाकारल्याने मंडळातील सर्व गावच्या ग्रामपंचायत ठराव, मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद व यांना देण्यात आले आहे. मंडळातील शेतकऱ्यांना यापूर्वी सलग तीन वर्षांत पीकविम्यासाठी हजारो रुपये खर्च करून व नैसर्गिक आपत्तीच्या सामना करूणही मदतीपासून वंचीत रहावे लागते.त्यासाठी प्रशासन अंदाजे आकडेवारी देणे, वीमाकंपनीच्या जाचक अटी यात मंडळातील शेतकरी भरडला जात आहे.त्या मूळे शेतकरी बांधवांनी आपल्या संतप्त भावना लेखी निवेदन दिले.रायमोह मंडळातील शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पीक विमा २५%अग्रीम. रक्कम व सर्व पीक जोखीम नियमाप्रमाणे मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती शिवराम राऊत यांनी केलीआहे.आयुक्त साहेब यांनी तात्काळ दखल घेत शेतक-यावर अन्याय होणार नाही.योग्यती चौकशी होईल व रायमोह मंडळाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी