जनावरांच्या लम्पी आजाराकडे प्रशासन राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष – ॲड. महेश धांडे

बीड (प्रतिनिधी) - लम्पी हा जनावरांना होणारा संसर्गजन्य चर्मरोग राज्यासह बीड जिल्हयात ही वेगाने पसरत आहे. अवघ्या आठ दिवसांतच रोगाने २५ जिल्हयात वेगाने हातपाय पसरले आहेत. पंधरा हजारांपेक्षा जास्त जनावरे या आजाराने बाधीत झाले असून शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
          बाधित गुरांच्या त्वचेवर फोड येऊन गुरांच्या आतील फुफूस, यकृत, आतडे यांवरही हल्ला करुन त्यांचे अवयवांना निकामी करत असल्याचे जिनोम सिक्वेन्सींगमधून आढळून आले आहे. कोवीड प्रमाणे जनावरांचे लसीकरण अनिवार्य करणे आवश्यक असताना बीड जिल्हयातील प्रशासनातील अधिकारी तसेच जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी मात्र हा मुददा मुग गिळुन गप्प आहेत. लम्पी आजार काळात जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात लसीकरणाबाबत प्रचार, प्रसार व माहिती पोहचविणे गरजेचे आहे.
पुढे आपल्या प्रसिध्दी पत्रकात ॲड. महेश धांडे यांनी या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते, लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो, जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात. तसेच हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर तसेच कानामागे सूज येते. जनावरे दूध देण्यास कमी पडतात. अशा प्रकारे लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
त्या अनुषंगाने त्यांनी लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे असलेचे अधोरेखीत करताना जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. 
   मात्र मुक्या जनावरांच्या बाबतीत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी हे संवेदनाहीन असुन जनावरांची निगा व लसीकरणाची जिम्मेदारी ही स्वत: जनावरांच्या मालकाने घ्यावी व तुमच्या जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहान जगदंब प्रतिष्ठान चे अध्यक्ष ॲड. महेश धांडे यांनी प्रसिध्दीपत्राकातून केले आहे. 
आपला



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी