डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चालणारा हा पक्ष असून ,गाव तेथे शाखा अभियानाच्या माध्यमातून मजबूत करणार - दिपकभाऊ निकाळजे

 
आष्टीत भव्य कार्यकर्ता मेळावा, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी 

आष्टी प्रतिनिधी 

आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केले,ते आष्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पार्टीचे महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांनी आयोजित केलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब पवार, दादासाहेब ओव्हाळ, सचिन कोकणे, अशोक ससाणे, सुनिल वाघमारे, दादासाहेब ओव्हाळ, भाऊसाहेब पगारे, सुनिल दाभाडे, अरूण भिगारदिंवे, रमेश भोईर,तान्हाजी भिसे, सुरेश दाभाडे, शशिकांत दारोळे, सचिन खरात, तान्हाजी मिसळे, महेंद्र मुनेष्वर, संतोष इंगळे, संदिप कडबू आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
आष्टी शहरात दि.२५ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड यांनी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना दिपकभाऊ निकाळजे म्हणाले की , सध्या ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पक्षाच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहेत. कोणत्या पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवयाची हे चर्चा करून ठरवू आगामी काळात पक्षाला बळकटी देण्यासाठी काम सर्वांनी मिळून करायचे आहे.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा पक्ष असून त्यांच्या विचारांचा गाडा पुढे घेऊन जायचा आहे.सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करणार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी, समान न्याय देण्याचे प्रयत्न राहणार असल्याचेही निकाळजे यांनी यावेळी बोलताना केले.या मेळाव्यास आष्टी तालुकाध्यक्ष दिलीप थोरात,शहराध्यक्ष  विनोद निकाळजे, उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे,पाटोदा तालुकाध्यक्ष सुखदेव उबाळे, रोहित वाघमारे, अमोल पवळे, दिपक जोगदंड,शहर उपाध्यक्ष अजय निकाळजे, सचिव सागर ससाने, अमोल काकडे, मल्हारी भोसले, मा.सरपंच जालिंदर गायकवाड,अक्षय जोगदंड, सुधीर जगताप, दिलीप ससाणे,शत्रूगण डाडर आदींसह बीड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, महिला,युवक उपस्थित होते.आष्टी तालुक्यातील अनेक गावात शाखेचे उद्घाटन, तसेच मोटार सायकल रॅली काढण्यात आली,या मेळाव्या प्रसंगी भिमगिताचा जंगी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पवार यांनी केले तर आभार अक्षय जोगदंड यांनी मानले.




गायरान जमिनीच्या प्रश्नावर समाजाची दिशाभूल होत आहे - कैलास जोगदंड

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) पक्षाची चळवळ युवक वर्गाने हाती घेतली असून मोठ्या संख्येने अबाल वृद्ध उपस्थित आहेत.दिपक भाऊंनी शासन दरबारी गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावून घ्यावा तसेच ऊस तोड मजूरांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या पण सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी केली,गायरान जमिनीच्या प्रश्नावर काही लोक वर्षानुवर्षे समाजाची दिशाभूल करत आहेत.दिपकभाऊचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून पक्ष वाढीस चालना द्यावी असे कैलास जोगदंड यांनी सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी