सफाई कामगारांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे - जिल्हाधिकारी
.
बीड ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व सफाई कामगार व इतर कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित अद्यावत कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा तात्काळ द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या संयुक्त बैठक संपन्न झाली त्या वेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित जिल्हायातील सफाई कामगारांच्या प्रश्नावर संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी जिल्हायातील सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत, रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे, मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी अशोक हिंगे पाटील, मराठवाडा अध्यक्ष, रोजंदारी मजदुर सेना, राजेश कुमार जोगदंड, जिल्हा अध्यक्षा अनिता बचुटे, उपाध्यक्षा आशाबाई कांबळे, कविता जोगदंड, सचीव प्रणीता आचार्य, परळी वैजनाथ शहर अध्यक्षा सोनुबाई आचार्य,सह जिल्हा पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. सदरील प्रकरणी कामगार कायद्यांच्या सोयी-सुविधा, शासन परिपत्रक निर्गमित सन २०१४ व २०१६ करण्यात आले. तरी अद्याप त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नाही. त्या करीता नोव्हेंबर २०१६ ते आजतागायत लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने झाली त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या संयुक्त बैठका मा. जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या दालनात संपन्न झाल्या.त्याचे इतिवृत्त तयार करण्यात आले. सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी त्यांचा अभिप्राय दिला. त्यावरून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी सविस्तर अहवाल मा. जिल्हाधिकारी यांच्या टेबलावर ठेवला होता. तरीही कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी वेळ काढूपना केला जात होता. त्यामुळे रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना योग्य ते निर्देश दिल्यामुळे सदरिल बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांनी साथ दिली.शेवटी बैठकीचे आभार मुख्याधिकारी नगरपरिषद बीड उमेश ढाकणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन बैठक संपन्न झाली,अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रसिद्धी प्रमुख राजेश कुमार जोगदंड यांनी दिली.
Comments
Post a Comment