पळसखेडा येथील उचापतखोर माकडांना जेरबंद करण्यात यश
सोयगाव प्रतिनिधी ,:सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणी मागील आठ ते दहा वर्षापासून माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे या माकडांचा त्रास आता नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता म्हणूनच मागील तीन महिन्यापासून गावातील नागरिक व ग्रामपंचायत पळसखेडा या विषयावर वारंवार वन विभागाला तक्रारी करत होते त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते राजू रेकनोद व राहुल सोनी वनविभागाच्या नेहमी संपर्कात होते .
त्यावअनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी गावातील माकडांचा सर्वे केला व आज माकडा जेरबंद करण्यासाठी वाहन घेऊन गावात धडकले
गावात असणाऱ्या माकडांच्या दोन्ही टोळ्या गावातच असल्याने गावातील एका भागामध्ये पिंजरा लावून या माकडांना 1टोळीतील 63 माकडांना जेरबंद करण्यात आले यावेळी वनविभागाच्या अधिकारी एलजी बोरसे मॅडम वनरक्षक फर्दापूर व एस एस राजपूत वनरक्षक अजिंठा समाधान गिरी शिवना याबरोबरच गावातील राजू रेकनोद, मनोज शेवगण ,संतोष गर्दे ,पंकज जैन ,अमोल थोरात गणेश घोंगडे गोपाल शिपाई राहुल जैन, सुनील जैन, विवेक महानोर वाल्मीक महानोर जम्बा तडवी सुमेर जमादार आदी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून वनविभागाचे आभार प्रकट करण्यात आले
Comments
Post a Comment