चारही शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत मोरवड ग्रामस्थांनी नारी शक्तीचा सन्मान केला - श्रीमती बोराडे मॅडम

चारही शिक्षीकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत मोरवड ग्रामस्थांनी नारी शक्तीचा सन्मान केला - श्रीमती बोराडे मॅडम

मोरवड शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम 

 


वडवणी,दि.२८(प्रतिनिधी) सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून योगायोगाने आज मोरवड ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आपल्या गावातील शाळेत कार्यरत असलेल्या चारही महिला शिक्षीकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून जो गौरव केला तो खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद असून या निमित्ताने आपण एकप्रकारे नारी शक्तीचा सन्मानच केला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत आज एक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. पवित्र असलेल्या शिक्षण क्षेत्रात देखील महिलांची संख्या व सहभाग लक्षणीय असून हे विकसित देशाच्या दिशेने नेणारे सुचवाच आहेत. बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार येथिल शिक्षिका, शाळा, विद्यार्थी, पालक व गावाला समर्पित असून येत्या काळात मोरवड येथिल शाळा व येथिल शिक्षक यांनी राज्य पातळीवर व देश पातळीवर देखील नावलौकिक मिळवावा हिच या निमित्ताने त्यांना सदिच्छा आहे. असे प्रतिपादन वडवणी गटसाधन केंद्राच्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती.बोराडे मॅडम यांनी मोरवड या ठिकाणी व्यक्त केले. 
                                 याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील मोरवड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवड या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती तसेच समस्त ग्रामस्थ मोरवड यांच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा २०२२ व पालक मेळावा या दोन्ही कार्यक्रमांचे संयुक्तपणे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडवणी गटसाधन केंद्राच्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती.बोराडे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा परभणी जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त कर्मचारी बब्रुवानजी शेंडगे, महाराणी ताराबाई विद्यालय वडवणीचे मुख्याध्यापक धुराजी राऊत, माध्यमिक विद्यालय वडवणीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव अंडील, माध्यमिक विद्यालय टाकरवनचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद शेळके, चिंचवन केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोविंद रामदासी, बीडचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कुंडलकर साहेब, वडवणीचे केंद्रप्रमुख सुरेश करांडे, चिंचाळा केंद्रप्रमुख श्रीमती.रुईकर मॅडम, ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक ईरमले साहेब, पत्रकार अविनाश मुजमुले, सतिश मुजमुले, रामेश्वर लंगे, ज्ञानेश्वर वाव्हळ, गोविंदराव शेंडगे, दिनूभाऊ शेंडगे, महादेवराव शेंडगे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी छान असे स्वागत गीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी बब्रुवानजी शेंडगे, धुराजी राऊत, महादेव अंडील, गोविंद शेळके यांसह आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोरवड शाळेच्या शिक्षकांपैकी आदर्श शिक्षिका श्रीमती.सुवर्णा सुतार-भालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोरवड येथील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी बीड जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत असा उपक्रम राबवत आपल्या शाळेत कार्यरत असलेल्या एकूण चार पैकी चारही महिला शिक्षीकांचा आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.माथेसुळ जे.डी., सहशिक्षिका श्रीमती.उंडाळे एस.आर., सहशिक्षिका श्रीमती.तारळकर जे.ए., यावर्षीचा बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षिका श्रीमती.सुतार एस.एम. या चारही शिक्षीकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच मोरवड गावातील भूमिपुत्र असलेल्या व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व गुणीजनांचाही यावेळी गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरवड सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नारायणराव शेळके यांनी विस्तृतपणे केले. तर बहारदार असे सुत्रसंचालन अंगद मुंडे सर यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार दिलीप शेंडगे यांनी अतिशय समर्पकपणे मानले. तसेच पुढील वर्षीपासून वडवणी तालुक्यातील एका आदर्श शाळेला जगद्गुरु तुकोबाराय सामाजिक आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार देवून सन्मानित करणार असल्याची घोषणाही दिलीप शेंडगे यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोरवड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शेंडगे,
दिलीप शेंडगे, सरपंच नवनाथ लंबाटे, चेअरमन नारायणराव शेळके, वचिष्ठ शेंडगे, दिलीप शेंडगे, रमेश अंडील, बाळकिसन शेळके, दत्ता शेंडगे, रामेश्वर कटारे, सुरेश थावरे, श्रीराम कटारे, दत्ता ठोंबरे, गहिनीनाथ शेंडगे, तुळशीराम गांडगे, मल्हारी उजगरे, माऊली मोटे, भाऊसाहेब शेळके, माऊली अंडील, मोकिंदा शेळके, प्रकाश चाळक सह आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास वडवणी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक वृंद, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व विशेषतः माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अतिशय उल्हासवर्धक व आनंददायी वातावरणामध्ये हा अभिनव असा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी