माजी सैनिक एफ.एम. गायकवाड यांचा सेवापुर्ती सोहळा सैनिकी विद्यालयात संपन्न
बीड प्रतिनिधी / सैनिकी विद्यालय बीड येथे शिक्षण निदेशक माजी सैनिक गायकवाड एफ.एम सर यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सोंडगे सर व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अंजनवती हायस्कूल अंजनवती चे मुख्याध्यापक प्रदीप जगताप व कानडी घाट हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय कसबे त्याचबरोबर डॉ. अभिजीत पंडित इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सैनिकी संचलन करून झाली मान्यवरांचा डाके सर यांनी स्वागत केले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षण निदेशक कोल्हे सर धारणकर सर सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी सर्वांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शिवनीकर सर व क्षीरसागर सर यांनी केले विद्यार्थ्यांसह सर्व नातेवाईक पाहुणेमंडळी सर्व प्रमुखातिथी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला
Comments
Post a Comment