जिल्हा हद्दीवरील नदीवर पुल नसल्यामुळे लगतच्या गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान


बीड जिल्ह्यातील नांदुर घाट तसेच धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद हे गावे जिल्ह्यातून वेगळे असले तरी किलोमीटरने मात्र तीन ते चार किलोमीटर आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील फकराबाद. पारा. डोंगरेवाडी व इतर गावे दळणवळणासाठी व इतर रोजच्या व्यवहारासाठी शिक्षणासाठी नांदूर घाटला येतात. परंतु ये जा करत असताना नांदुर घाट जवळ असलेल्या पापनाशी नदीवर पूल नसल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे दोन ते तीन महिने शैक्षणिक नुकसान होते. शेतकऱ्यांची नांदुर घाट व्यापार पेठ असल्यामुळे दळणवळणासाठी त्यांना देखील अडचणी येतात. त्यामुळे या सर्व गावातील लोकांनी प्रशासनाला अशी मागणी केली आहे की पापनाशी नदीवर तात्काळ आम्हाला पुल करून द्यावा जेणेकरून आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल हे काम जिल्हा हद्दीवर असल्यामुळे काम होत नाही काम रखडले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे प्रशासनाने आमची दखल घेऊन तात्काळ पापनाशी नदीवर पूल करून द्यावा अशी मागणी फकराबाद व नांदूर घाटच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी