सोयगाव तालुका वॉटर ग्रीड योजनेला तत्वता मान्यता !



 कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय


 पॉइंटर.....

- अभ्यास करून दोन आठवड्यात घेणार पुन्हा बैठक 

- निजामकालीन बंधाऱ्यांसाठीही घेतली जाणार बैठक 


मुंबई, प्रतिनिधी ‌‌ सोयगाव‌ / ‌ , ‌दि, २७, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोयगाव तालुक्यातील वॉटर ग्रेड योजनेला तत्वता मान्यता देण्यात आली.
 बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापोड तसेच मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 तालुक्यातील तहान भागवण्याचा मानस

 औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव हा दुर्गम आणि डोंगरी विभागात येणारा तालुका आहे. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा मानस कृषी मंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी केला आहे. सोयगाव तालुक्याची तहान भागवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी निजामकालीन बंधाऱ्यांची पुनर्बांधणी करून पाणी प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न त्यांची सुरू आहे. त्यासाठी ही एक विशेष बैठक पुढील आठवड्यात घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
 
 कुठून मिळणार पाणी

 सोयगाव वॉटर ग्रीड योजनेसाठी कुठून पाणी उपलब्ध होईल. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर दोन आठवड्यांनी याविषयी पुन्हा बैठक घेणार असल्याच्या माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.
.,,

कोट....योजना संजीवनी ठरणार

 सोयगाव तालुक्यातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. त्यासाठी वॉटर ग्रीड योजना तालुक्यासाठी संजीवनी ठरणार आहे. योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यास माझा मानस आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी