वडवणी तालुका मराठवाडा शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर; मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ संपन्न
- समान संधी समान दर्जा कुठे आहे? शिक्षकांचा सरकारला सवाल.
- संविधानाने दिल्यालं प्रतिनिधित्व सरकारने हिरावून घेतलं - गणेश आजबे
- आमदारांचं पेन्शन बंद करा- कालिदास धपाटे.
- चुकीच्या धोरणामुळे शिक्षक अनुदानापासुन वंचित - अॅड.राज पाटील
वडवणी | प्रतिनिधी
वडवणी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्याच अनुषंगाने मराठवाडा शिक्षक संघाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. व त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष माजी प्राचार्य महादेव अंडील होते. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, सरचिटणीस राजकुमार कदम, सचिव गणेश आजबे, लढा दुष्काळाशी फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. राज पाटील, मुख्याध्यापक एस. एस. अडसूड, पत्रकार आशोक निपटे, निर्माते आशोक फपाळ, पत्रकार सतीश मुजमुले, पत्रकार हनुमंत मात्रे,पत्रकार गीतांजली लव्हाळे, पत्रकार अर्जुन मुंडे, यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. अंडील सर यांनी केले. सुरुवातीलाच प्रस्ताविक नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास काकडे यांनी केले ते म्हणाले की, अनेक वर्षापासून विनाअनुदानित शिक्षक काम करत आहेत. आजही त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्यांना कायम करावं व पेन्शन पद्धत पुन्हा नव्याने सुरू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर लांडे सर यांनी सुद्धा शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर आपले विचार व्यक्त केले.पुढे पत्रकार आशोक निपटे म्हणाले की, जे लढायला कुठेतरी पुढे ऊभे राहतं आसतात त्यांना आपण बळ देण्याची गरज असते. कारण बरेच जण म्हणत असतात की ज्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे त्याचा आपण असा आवाज उठवला पाहिजे. कारण पुढे व्हायचं म्हटलं तर भीती वाटते कुणी आपल्याला नाव घेईल का? आपल्यावर आक्षेप घेईल का? तर मला वाटतं ज्यांच्यापाशी आहे त्यांनी ज्यांच्या कडे नाही त्यांना द्यावे.त्यानंतर राज पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, अनेक वर्षापासून शिक्षक बांधवांचा लढा सुरू आहे त्यांचा हा धडा यशस्वी व्हावा यासाठी मी लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या वतीने त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पाठिंबा जाहीर करतो. शिक्षकांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी आहे असेही राज पाटील म्हणाले. त्यानंतर गणेश आजबे
तालुक्याच्या कार्यकारणीची नियुक्ती आणि सत्कार हा दुहेरी योग! मित्रांनो संघटनेची गरज काय काम करू शकते हे या ठिकाणी असणारे जेष्ठ मंडळी आपल्याला सांगतील. मराठवाडा या संघटनेने तब्बल 15-17 वर्षे लढा देऊन सेवा शाश्वती पासून सेवानिवृत्ती पर्यंतचे सगळे लाभ मिळून दिले. सुरुवातीच्या कालखंडामध्ये शिक्षकांना ज्यावेळेस शिक्षक नियुक्त केले 1972 73 ला महाराष्ट्र 18 वर्षे संघटनेचे तीन आमदार मराठवाड्यामध्ये काम करत होते. या आमदारांनी अनेक गोष्टी मिळून दिल्या परंतु पुढच्या काळामध्ये जे माझ्यासारखी नवीन पिढी लागली ही सुद्धा 2003 मध्ये नोकरीला लागली. या पिढीला मागच्या ज्या लोकांनी मिळून दिले याच्याबद्दल जाणीव राहिले नाही. त्यांना हे कसं मिळालं काय झाले याची काही माहिती नाही जे मिळतंय ते शासन देतच असते अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि तिथून पुढे 2004 ला संघटनेचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी जे सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडायचे हे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी या नव्या पिढीमुळे किंवा काही राजकीय हस्तक्षेपाने सभागृहात गेले नाहीत.या शाळेला अनुदान मिळाले तरच खडूला पैसे मिळतात. सरसगट शाळेना अनुदान दिले पाहिजे. 2ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयवर शिक्षकांचा विराट मोर्चा निघनार आहे. कालिदास धपाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
1967 पासून ही चळवळ उभी केली.
शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे सेवा शाश्वती नव्हती सेवानिवृत्ती वेतन सुद्धा नव्हतं हे सगळे लाभ संघटनेने फार मोठ्या प्रमाणावर चळवळी करून संघर्ष करून हा संघर्षाचा खूप मोठा इतिहास आहे. मागच्या पिढ्याने खस्ता खाऊन फार मोठ्या चळवळी करून अनेक दिवस संघर्ष करून हे सगळे लाभ प्राप्त केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगितलं की शिक्षक अनुदान संस्कृती संस्थान झाले. आणि अनुदान या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, नंतरच्या काळामध्ये बघा बाबासाहेब आंबेडकरांना जेवढी दुर दृष्टी होती. आपल्याला या संघटनेच्या मार्फत मला राजकीय पक्षाने सुद्धा जुन्या काळामध्ये नैतिकता पाळणे मित्रहो, कोमल पाटलापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी विधिमंडळामध्ये त्यांचा स्वतःचा प्रतिनिधी दिलेला सुद्धा नव्हता. उमेदवार असे 14 आमदार होते म्हणजे सात शिक्षक संघटनेचे आमदार त्यांचे शिक्षक मतदार संघातून आणि साथ पदवीधर मधल्या आमदार जायचे ते प्राध्यापकाचे आहे आणि त्यांनी मांडलेला प्रस्ताव त्यांना सगळ्यांना मिळून पारित करावा लागायचा. आणि मग लक्षात ठेवा आपल्याला कायदेमंडळ हे विधानमंडळ लोकशाहीमध्ये आपल्याला काय पर्याय आहे याच
कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो.
पेन्शन बंद केल्यामुळे शिक्षकावर मोठे संकट
2012 पासून शिक्षकांच्या व सर्वच नोकऱ्या बंद आहेत.
54 दिवस शिक्षकांनी संप केला होता. वंसतराव दादा पाटील मुख्यमंत्री असतांना. अध्यक्ष भाषणात
अंडील सर म्हणाले की
मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे.तरच आपल्याला किंमत आहे. स्वतःचं काम करून संघटनेचे काम करायचं आहे. अंशतः पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन द्यावी अशी एक मोठी मागणी शिक्षकांची आहे. गेल्या दहा पंधरा वर्षापासून बिना अनुदानावर शिक्षक काम करतात एका बाजूला 80 ते 90 हजार रुपये पगार आहे. आणि दुसऱ्या बाजूला शून्य रुपये पगार आमचा शिक्षणाचा प्रतिनिधी सभागृहात असेल तरच आमचे प्रश्न सुटणार आहेत. असं अंडील सर यांनी सांगितले. जुने आणि नव्याने एकत्र काम करावं आणि आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घ्याव्यात असे आवाहन अंडील सर यांनी केले. सरसकट शिक्षकांना अनुदान देण्यात यावं.शेवटी
आभार पर्यवेक्षक वाय बी भोसले यांनी आभार मानले.
शिक्षकांचा एक डोळा धोरणावर! शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आयुष्य खर्च करतो. फळ्यावरील ज्ञान विद्यार्थ्यांच्या डोक्यात कसे जाईल यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र शासनाने शिक्षकांच्या जीवनाशी खेळ मांडला आहे. धोरणं धोकेबाज बनवले आहेत. त्यामुळे या पुढे विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम फळ्यावर करीत असताना शासनाच्या धोरणावरही लक्ष द्यावे लागणार आहे. एक डोळा फळ्यावर तर दुसरा डोळा शासनाच्या धोरणांवर ठेवा. कालिदास धपाटे जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ
Comments
Post a Comment