बिनपगारी शिक्षकांना शंभर टक्के पगार मिळवण्यासाठी मोर्चात सामील व्हा.

         


                         मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास काकडे यांचे आवाहन


 वडवणी प्रतिनिधी   

विनाअनुदानित शिक्षकांना शंभर टक्के वेतन द्या या प्रमुख मागणीसह पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर वीनाअनुदानित बिनपगारी शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे वडवणी तालुकाध्यक्ष श्रीनिवास काकडे यांनी केले आहे.




    2001 सालापासून शासनाने शिक्षण क्षेत्रात कायम विनाअनुदानित धोरण आणल्यापासून आत्तापर्यंत शिक्षकांची उपासमारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तीन-चार पक्षाची सरकारे आली आणि गेली परंतु शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्या शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्याचे काम एकाही सरकारने केलं नाही. त्यामुळे अनेक बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या पुढे जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना मागील वीस वर्षापासून पगार नसल्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबाची फरपट चालू आहे. शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली. आंदोलनही केली. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार शिक्षकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आता शिक्षकांचा संयम ढासळत आहे. आता "करो या मरो" या पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय शिक्षकांना पर्याय राहिला नाही. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघ या आंदोलनावर विशेष लक्ष केंद्रित करीत आहे. बीड जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित बिनपगारी शिक्षक यांना सोबत घेऊन मराठवाडा शिक्षक संघ या आंदोलनामध्ये उतरले आहे. येत्या दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी बीडच्या जिल्हा अधिकारी कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जुने पेन्शन योजना सुरू करून शंभर टक्के सरसकट अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत. या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील हजारो बिन पगारी शिक्षक आणि आणि पेन्शन धारक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे वडवणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास काकडे यांनी केले आहे.






 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी बीड येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधून निघणारा हा मोर्चा जिल्हा कचेरीवर जाणार आहे. या मोर्चात मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांच्यासह माजी अध्यक्ष तथा जेष्ठ शिक्षक नेते पी. एस. घाडगे सर, विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या मोर्चाचे नियोजन जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे आणि जिल्हा सरचिटणीस गणेश आजबे करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व नियोजन करण्यात आले आहे.                                             

कालिदास धपाटे. जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ



शिंदे फडणवीस सरकार सोडणार का प्रश्न?
मागील काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार कार्यरत झाले आहे. मागील वीस वर्षापासून खितपत पडलेला विनाअनुदानित शिक्षकांचा हा प्रश्न शिंदे फडणवीस सरकार तरी सोडणार का? असा सवाल या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी