बालाजी गुरखूदे यांची आर्म्स ॲक्ट गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता
बीड : - ( प्रतिनिधी ) : फिर्यादी महेश मंगलराव चव्हाण , नेमणूक दरोडा प्रतिबंधक पथक , बीड यांना दि.३१-०३-२०१९ रोजी सोबत सहपोलीस निरीक्षक गजानन जाधव साहेब , पो.ह. सौंदरमल , नागरगोजे , खताळ , राठोड , शिंदे भागवत गिते म.पो.ना. , साबळे , असे सरकारी जीप क्र . एमएच २३ / ए एफ ०० ९ ३ या वाहनाने चालक पो . शिपाई दुधाळ सह बीड शहरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमी मिळाली की , इसम नामे बालाजी गिरधारीलाल गुरखूदे , रा . नवी भाजी मंडई , बीड़ हा त्याचे ताब्यात घातक शस्त्र तलवार व कटियार जवळ बाळगून भाजी मंडई येथे फिरत आहे , अशी बातमी मिळाल्यावर दोन पंचासह बातमीच्या ठिकाणी अचानक १३.४५ वाजता शोध घेतला असता , इसम त्याचे उजवे हातात तलवार घेऊन ( शस्त्रासह ) बेदरे सोनार यांचे दुकाना समोर मिळून आला . त्यास ताब्यात घेवून नाव , गाव विचारले असता , त्याने बालाजी गिरधारीलाल गुरखूदे असे नाव सांगितले वरून , त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेता , त्याचे कमरेस डावे बाजूस एक कटीवार व एक स्टीलची मूठ असलेली लोखंडी पाते असलेली दोन फूट ६ इंच लांबीची तलवार मिळून आली , ते नमूद २ पंचासमक्ष त्याचा जप्ती पंचनामा करुन , पंचाच्या सह्या चिठ्ठया लावून तपास कामी ताब्यात घेतले . सध्या बीड येथे लोकसभा निवडणूक चालू असल्याने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे व जिल्ह्यात कलम ३७ ( १ ) ( ३ ) महाराष्ट्र पोलीस कायदा हा चालू असताना सदर कलमाचे उल्लंघन केले म्हणून आरोपी विरुद्ध गु.र.नं .००६८ / २०१ ९ कलम ४/ २५ इंडियन आर्म्स अॅक्ट व १३५ मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढीला तपास श्री . शिवाजी सानप साहेब यांच्याकडे दिला . तपासात त्यांनी साक्षीदारांचे तपास टिपण नोंदवले व आरोपी विरुध्द भरपूर पुरावा मिळून आल्याने आर.सी.सी.नं. १२२ / २०१ ९ प्रमाणे मा . कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले . त्यावरून सदर प्रकरण हे मा . मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब , बीड यांचे न्यायालयात सरकार पक्षा तर्फे एकूण ३ साक्षीदार तपासण्यात आले .
सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ३ साक्षीदार तपासण्यात आले ; परंतु सरकारी पक्षाच्या कुठल्याही साक्षीदाराची साक्ष आरोपी विरुध्द गुन्हा सिद्ध करू शकला नाही . सदर प्रकरणात आरोपीचे वकील अॅड तेजस वहमारे यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण बचाव ग्राह्य धरून मा . न्यायालयाने आरोपी श्री बालाजी गिरधारीलाल गुरखूदे यास निर्दोष मुक्त केले . सदर प्रकरणात आरोपीचे वतीने ॲड. तेजस वडमारे यांनी काम पाहीले व त्यांना ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. . विनायक जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले .
Comments
Post a Comment