पाटोदा तहसीलदार यांच्या कडून सरकारी वाहनाचा दुरउपयोग चक्क बाजार करण्यासाठी तहसिलच्या गाडीचा वापर
पाटोदा (प्रतिनिधी गणेश शेवाळे )“दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण” असाच काही प्रकार पाटोदा तहसील मध्ये पाहिला मिळत आहे. पाटोदा तहसिलदार कार्यालयात सामान्य नागरिकांना गेल्यावर अनेक शासकीय नेम दाखवतात मात्र स्वतः शासकीय नेमाचे पालन करत नाहीत असाच प्रकार गुरुवार दिनांक 29/09/2022 रोजी पाहिला मिळाला पाटोदा तहसीलदार दुपारी 2.30 मिनिटांच्या सुमारास शासकीय वाहन घेऊन चक्क बाजार करण्यासाठी बाजारात गेल्या तासभर तहसिल प्रशासानाचे वाहन बाजार स्थळा जवळ उभे असल्यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनाचा दूर उपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी तालुक्यातील नागरिका कडून चूक झाली तर महसुल विभाग लाखो रुपय दंड वसूल करतात मात्र अधिकाऱ्यांनी चुक केल्यावर वरिष्ठ अधिकारी काही कारवाई करतील का ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकापुडे पडला आहे
Comments
Post a Comment