हिवरसिंगा प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी संपन्न
सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यासाठी श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेहमीच आ्ग्रेसर-डॉ.तांबारे
(शिरूर प्रतिनिधी) दि.२९ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय रायमोह व श्री निवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिवरसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ उपक्रम अंतर्गत जि.प.के.प्रा.शाळा हिवरसिंगा येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी उपक्रम संपन्न झाला या साठी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी तांबारे सर, डॉ.संध्या पुरनाळे,श्री.विनोद कोल्हे,सौ.बोत्रे,तसेचश्री.शेख सर(मुख्याध्यापक) श्री.कंठाळे सर (मुख्याध्यापक)
श्री.शिवराम राऊत (अध्यक्ष श्रीनिवास बहुउद्देशीय.सेवासंस्था) श्री.उमेश शिंदे.( अध्यक्ष-शाळाव्यवस्थापन समिती ),श्री.शिवाजी शिंदे.याची उपस्थिती होती.आरोग्य विभागाच्या माध्यमातून इ.१ली ७वी मधील २२० तर मानुरकर महाराज माध्यमिक विद्यालय मधील ८वी.ते १०वी ८०. विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आली.मौ.हिवरसिंगा येथे डेंग्यू साथरोग प्रसार वाढल्याने व शालेय विद्यार्थी यांचे आरोग्य महत्वाचे यासाठी श्री.शिवराम राऊत (अध्यक्ष-श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था) व माऊली शिंदे (ता.अ.शिवसंग्राम शिरूर) यांनी डॉ.सुरेश साबळे सर (जिल्हा शल्यचिकित्सक बीड) प्रत्यक्ष भेटून गावातील ताप,सर्दी,खोकला,तत्सम रूग्ण संख्या वाढत आहे.त्यामध्ये बहुसंख्य प्रमाण हे ५ ते १७ या शालेय वयोगटातील असल्याने शालेय स्तरावरील विद्यार्थी आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे माहिती दिल्याने रायमोह ग्रा.रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेला पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्वरित तपासणी उपक्रम संपन्न केला.या वेळी हिवरसिंगा जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध संकटसमयी सेवावृत्तीने श्रीनिवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत अध्यक्ष राऊत यांनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी के.प्रा.शाळेतील श्री.दत्तात्रय दुधाळ सर,श्री.अरुण मिसाळ,श्री.संदीप कदम सर, श्रीम.मिसाळ ताई, श्रीम.बोडखेताई, श्रीम.दोडके ताई, श्रीम.जेधे ताई, मानुरक मा.विद्यालयातील शिक्षकवृंद,गौतम औसरमल, सुनिल दुधाळ,सह पालकांची उपस्थित होते.
Comments
Post a Comment