अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आण्णाभाऊ साठे जन्मोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - खंडू जाधव
बीड प्रतिनिधी - तळागाळातील समाजातील तरुणांनी डॉक्टर, वकील, पोलीस, कलेक्टर झाले पाहिजे ही संकल्पना उराशी बाळगून समस्त दलित चळवळीच्या एकेकाळी पाठीचा कणा राहिलेल्या दिवंगत कर्मवीर एकनाथरावजी (जीजा) आवाड यांच्या विचार धारेचा समाज घडविण्याचा वसा अंगीकृत करून समाजाला समविचारी विचार धारेशी जोडण्याचे काम करत असलेले मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष प्रा.डॉ. मिलिंद आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी हक्क अभियान बीड जिल्हा शाखा माजलगाव आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मोत्सव सोहळा १ ऑगस्ट रोजी ठिक २ वाजता वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव येथे पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भूषवणार आहेत. तर उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. तथा मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद आवाड हे असणार आहेत.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव खंडू जाधव यांनी जाहीर आव्हान केली आहे.