लिंबागणेश येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लिंबागणेश : (दि.२४) माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्ष चे संस्थापक अध्यक्ष श्री. ओमप्रकाश (बच्चू) कडु यांनी मांडलेल्या शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभावावर २० टक्के प्रोत्साहन बोनस, कामगार, दिव्यांग व विधवा महिलांना मासिक ६००० रुपये मानधन, तसेच रोजगार, शिक्षण व आरोग्य या मूलभूत मुद्द्यांवर तातडीने निर्णय घ्यावेत या मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी “चक्का जाम” आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लिंबागणेश येथेही आंदोलन करण्यात आले.
आज गुरुवार, दि.२४ रोजी सकाळी अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांची समायोजित भाषणे झाली.
यावेळी नेकनूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, पो.शि. बाबासाहेब खाडे, विशाल कदम, पो.हे. अनिल राऊत हे देखील उपस्थित होते.
आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ आप्पा गिरे, बाळकृष्ण थोरात, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ, संजय घोलप, अभिजित गायकवाड, सय्यद अख्तर, दादा गायकवाड, अंकुश वाणी, भगवान मोरे, भालचंद्र गिरे, तुळशीराम वनवे, गणपत घोलप, प्रकाश ढवळे, धनंजय बागल, दादाराव घाडगे, विशाल वाणी , प्रकाश निर्मळ,संदिप निर्मळ,अजय थोरात आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
Comments
Post a Comment