पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी बसच्या धडकेत भीषण अपघात पती-पत्नी ठार

पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. एसटी बसच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे बाळू केशव वायकर आणि त्यांची पत्नी लता बाळू वायकर, रा. घाटेवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड अशी आहेत. दुचाकीवरून जात असताना रुग्णालयासमोर एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात हलवले असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी