होमोओपॅथीक डॉक्टर च्या आझाद मैदानावरील आंदोलन साठी डॉक्टर रवाना:डॉ. राजेंद्र बंड



बीड प्रतिनिधी -या बाबत सविस्तर वृत्त असे की होमोईओपॅथ डॉक्टर च्या सि. सी. एम. पी. कोर्स ची एम. एम. सी. कडे नोंदणी करणे, तसेच शासकीय सेवेत रुजू करून घेणे, तसेच त्याना शिक्षण चालू असताना सवलती देणे यासह इतर अनेक मागण्या चे निवेदन मा. जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले होते, परंतु त्यावर सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून मुंबई येथील आझाद मैदानावर होमोओपॅथ डॉक्टर आमरण उपोषण सुरू करणार आहेत
त्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र बंड सहित, डॉ. ठोकरे, डॉ काळे गणेश, डॉ राजपुरे, डॉ खरसाडे, डॉ वरूनगळे, डॉ होणंराव,डॉ चव्हाण, डॉ पदमुले, डॉ चोले, डॉ जवरे, डॉ कृष्णा राऊत, डॉ धनवडे, डॉ जगताप, डॉ रोहित राऊत, डॉ नेहरकर, डॉ जितीन दादा वंजारे, डॉ भोंडवे, डॉ आंधळे, डॉ खेडकर, डॉ गवारे, डॉ रमेश शिंदे, डॉ सुहास धुमाळ,डॉ साळुंके नाथापूर, डॉ अरडे, डॉ गायके सह शेकडो डॉक्टर आंदोलन मध्ये सहभागी होण्यासाठी उद्या आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत आणि सगळे डॉक्टर एकत्र निघालो आहोत असे होमोओपॅथिक डॉ. संघटना चे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र बंड यांनी कळवले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी