बीड डीसीसी बँकेचा मनमानी कारभार

बीड डीसीसी बँकेचा मनमानी कारभार ....
 बीड प्रतिनिधी - बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे व्यवहार मागील अनेक वर्षापासून बीड डीसीसी बँकेमध्ये आहेत. बीड जिल्हा उपनिबंधक साहेबांनी पोस्टल पत पेढी चे अध्यक्ष आणि सचिव यांच्या बडतर्फीचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला विभागीय निबंध सहकारी संस्था लातूर यांनी स्थगिती दि. 26.06.2025 दिलेली आहे .याबाबतचे पत्र सचिव आणि अध्यक्ष यांनी बीड जिल्हा उपनिबंधक साहेब आणि डीसीसी बँकेस सादर केलेले आहे . परंतु जिल्हा उपनिबंधक साहेब बीड यांनी आर्थिक व्यवहार बंद करण्याबाबत कसलेही तोंडी अथवा लेखी आदेश बँकेत दिलेले नसता नाही ते डीसीसी बँकेने बीड पोस्टल पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार कोणाच्या तरी सांगण्यावरून बंद केलेले आहेत. त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांचे आर्थिक नुकसान तसेच पतसंस्थे व बीड डीसीसी बँकेचे ही आर्थिक नुकसान झालेले आहे. बीड डीसीसी बँकेचे अधिकाऱ्यांना समक्ष भेटून व्यवहार चालू करण्याची विनंती केलेली होती, तसेच बीड जिल्हा उपनिबंधक साहेबांना ही लेखी निवेदन देऊनही पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार बँकेने चालू केले नाहीत याची दखल बँकेच्या प्रशासकांनी घेऊन पतसंस्थेच्या सभासदांची आर्थिक मानसिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी असे आवाहन पोस्टल पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी केलेले आहे संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या कामासाठी लग्नकार्याच्या कामासाठी शेती आणि आरोग्यविषयक कामासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असताना बँकेने हे व्यवहार बंद केले आहे ते त्वरित चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन सामान्य सभासद आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी