मुंबई येथील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या उपोषणाला जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथ नी उपस्थित राहावे-डॉ.जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी :- ज्या ज्या होमिओपॅथिक डॉक्टरांचे सीसीएमपी कोर्स पूर्ण झाले आहेत त्या त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन एमएमसीला होणे अनिवार्य आहे आता यापुढे 16 जुलैपासून जर एमएमसीला रजिस्ट्रेशन केले गेले नाही तर यापुढेही तीव्र अशा पद्धतीचे उपोषण आणि आंदोलने केले जातील.बीड जिल्ह्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना होमिओपॅथिक हिमा डॉक्टर संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ही लढाई आर आणि पारची असून होमिओपॅथिक डॉक्टरांचे एम एम सी ला रजिस्ट्रेशन होणे आणि आधुनिक मेडिसिन वापरण्याची मुभा मिळणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण सर्वांनी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आव्हाहन हिमा डॉक्टर संघटनेचे महासचिव डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.
दिनांक 16 जुलै 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सकाळी बारा वाजता होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व होमि. डॉक्टर्स यांना भेटनार आहेत आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स त्यांना निवेदने देणार आहेत दिनांक 16 जुलै पासून ते 18 जुलै पर्यंत लाक्षणिक उपोषण आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे, महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स, आर एम ओ आणि होमिओपॅथिक कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जुने नवे होमिओपॅथिक डॉक्टर सर्वांनी या उपोषणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ. जितीन वंजारे खालापुरीकर यांनी केले आहे.
होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक मेडिसिन वापरण्यासंदर्भामध्ये 9 जानेवारी 2014 मध्ये दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि 2014 च्या जून महिन्यात पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी दिली. या मध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिसणर ऍक्ट 1960 मध्ये बदल करत होमिओपॅथीक डॉक्टरांना आधुनिक औशोधपचाराची परवानगी घेण्यासाठी एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स एमबिबिएस कॉलेज ला पूर्ण करण्याची तरतूद केली त्याच बरोबर महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल ऍक्ट 1965 मध्ये सुधारणा करत जे होमिओपॅथीक डॉक्टर सीसीएम पी कोर्स पूर्ण करतील त्यांना शेड्युल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवण्याची तरतूद केली. एक जुलै 2014 पासून हा कायदा राज्यात अमलात आला दिनांक आठ जुलै 2014 रोजी राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. याला आय एम ए या खाजगी संघटना महाराष्ट्र राज्य कडून कडाडून विरोध करून कोर्टात अर्ज क्रमांक 7847/14 रीट पि्टीशन दाखल केले यावर परत सभागृहात चर्चा झाल्यामुळे स्टे लावला गेला,काही दिवसापूर्वी होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक मेडिसिन वापरता येणार नाही आणि एम एम सी ला रेजिस्ट्रेशन मिळणार नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला परंतु उद्याच्या 16 तारखेच्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची भेट होणार असून यामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वतोपरी आरोग्य सेवा ही होमिओपॅथिक डॉक्टर्स पूर्ण करतात त्यामुळे त्यांना इमर्जन्सी मेडिसिन्स आणि आधुनिक औषधी वापरण्यात मुभा द्यावी, आणि ज्यांचे सिसीएमपी कोर्स झाला आहे त्यांना एम एम सी ला रेजिस्ट्रेशन द्यावे,यासंदर्भात निवेदन देणार आहोत जर दोन्ही सभागृहांमध्ये या कायद्याला विरोध झाला तर महाराष्ट्रातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर्स रस्त्यावर उतरून निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत याची खबरदारी शासनाने घ्यावी आणि तात्काळ सीसीएमपी कोर्स पूर्ण डॉक्टरांना एमएमसी चे रजिस्ट्रेशन देऊन सर्वच होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक मेडिसिन वापरण्याची तरतूद करावी अशी मागणी होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ.जितिनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment