डॉ.शाह,डॉ.भस्मे,डॉ.कवीश्वर,डॉ.जगताप,डॉ पवार यांच्या नियोजनबद्ध उपोषणाला यश- डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आणि उपोषण स्थळी पोहचलेल्या आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या लक्षवेधी मुळे मुख्यता (आ. सुरेश धस साहेब)मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावून शासनाने आठ दिवसाचा वेळ मागितला आहे.तरी तूर्तास आंदोलन उपोषनाला स्थगिती दिली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य दयनीय स्तिथी पाहता होमिओपॅथी डॉक्टरांचे मोठे योगदान असून तेच जर उपोषणास बसत असतील तर सरकार झोपा काढत आहे का? ही दयनीय आणि गंभीर अवस्था आहे असा खडा सवाल आमदार सुरेश धस साहेबांनी यावेळी केला. कोव्हीड काळात होमिओपॅथीक डॉक्टरांचे योगदान मोठ असून प्रत्येक इमेरजन्सी काळात वेळोवेळी निःस्वार्थ सेवा होमिओपॅथीक डॉक्टर देतात शासनाला सहकार्य करतात मग कायदा पारीत असतानाही त्यांची अशी हाल अपेष्ठा का? यावर मी मा. मुख्यमंत्री साहेबाना बोलतो तुम्हाला न्याय देणार असा निर्धार यावेळी महाराष्ट्राचे लोकनेते आमदार सुरेश धस साहेबांनी केला.डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या विनंतीला मान देऊन आमदार सुरेश धस आंदोलनस्थळी आले आगमन होताच त्यांचं अगदी जोरात टाळ्या च्या गजरात आणि अण्णा अण्णा म्हणतं सर्व डॉक्टरांनी स्वागत केल माझ्या तालुक्याचे आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस आमचे लोकप्रतिनिधी म्हणून मुंबई येथील आझाद मैदानावर आले हीच लोकप्रतिनिधी म्ह्णून आणि लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे असे डॉ जितीन वंजारे यावेळी बोलताना म्हणाले. सरकार सोबत योग्य आणि सकारात्मक चर्चा झाल्यामुळे समाधानी होमिओपॅथीक डॉक्टर्स, सर्व एम सी एच आणि सी सी एच चे पदाधिकारी आनंदात वापस फिरले. आंदोलनाला कसलेही गालबोट लागले नाही पोलिसांनी दडपशाही चा प्रयत्न करायला सुरुवात केली होती पण सुज्ञ आणि कुशाग्र असणाऱ्या होमिओपॅथीक डॉक्टरांनी त्यांचा कुटील डाव हाणून पाडला. आंदोलनाची लिडींग कमान होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे सर्वेसर्वा मा.डॉ. बाहुबली शाह सर, संघटनेचे पितामह व्यक्तिमत्व केंद्रीय होमिओपॅथी कॉन्सिल चे माजी अध्यक्ष आदरणीय डॉ अरुण भस्मे सर, डॉ कवीश्वर सर,चळवळीचा बुलंद आवाज डॉ जगताप सर, डॉ विजय पवार सर इत्यादीनी अगदी योग्य शब्दात योग्य गोष्टी कॅबिनेट समोर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगितल्या सकारात्मक प्रतिसादनंतर च संघटनेचे सर्वेसर्वा डॉ बाहुबली शाह सरांनी जूस घेऊन आंदोलनास तूर्तास स्थगिती दिली. आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर मी स्वतः इथे येऊन परत आंदोलन करेल आणि आत्मदहनही करेल असा ईशारा येथील सरकार ला दिला. यावेळी इथे जवळजवळ पंधरा आमदारांनी व्हिजिट केल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातून आणि कर्नाटक मधूनही काही आंदोलक डॉक्टर बंधू भगिनी इथे आल्या होत्या, जवळ जवळ पंधरा हजार होमिओपॅथीक डॉक्टर इथे हजर होते त्यामुळे पोलिसानी योग्य खबरदारी घेत ऍम्ब्युलन्स सेवा, टॉयलेट सेवा, आणि गरज भासल्यास आंदोलन दडपण्यासाठी पाण्याची बौच्छार करण्याच्या गाड्या आणि विशेष सेक्युरिटी पथकही इथे तैनात केले होते. एकंदरीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलक डॉक्टर आनंदात वापस फिरले. अशी माहिती हिमा डॉक्टर संघटनेचे बीड जिल्हा महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिली.आणी आलेल्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींचे, मिडियाचे, पत्रकार बंधू भगिनींचे, मीडिया चॅनेल चे सर्वस्वी आभार मानले.
Comments
Post a Comment