'नाही रे' वर्गासाठी सदैव कार्यरत राहणे गरजेचे - प्राचार्य डी.जी.तांदळे
बीड (प्रतिनिधी ) शिक्षक नेते तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे,बीड शहर बचाव मंच परिवाराचे मार्गदर्शक प्राचार्य डी.जी. तांदळे चा 70 वा वाढदिवस बीड शहर बचाव मंच व मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दि. 17 जुलै 2025 रोजी शहरातील भाजी मंडई येथील बेघरांच्या जिव्हाळा केंद्रात विविध सामाजिक संघटनांचे राजकीय पक्षांचे प्रमुखांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील विविध क्षेत्रातील यशस्वीपणे कार्य करणाऱ्या मान्यवरांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डी.जी.तांदळे यांनी सत्कारा निमित्त आभार व्यक्त करताना, आपण सर्वजण गाडगे बाबांचे जमेल तितकं तरी कार्य करूया उपाशी आहेत त्यांना अन्न ,उघडे आहेत त्यांना वस्त्र ,आरोग्य ,शिक्षण, निवारा देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया निदान सहकार्य तरी करूया नाही रे वर्गासाठी आपण सर्वजण मिळून कार्यरत राहून वंचितांना,बेघरांना मदतीचा हात देऊया असे मत डी.जी.तांदळे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सोबत काम करताना आलेले अनुभव व जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला यावेळी डी.जी.तांदळेनी आयुष्यभर केलेल्या कार्यावर सर्वांनी प्रकाशझोत टाकून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या उदंड आयुष्याची ईश्वरचरणी कामना केली.उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी मोठ्या सन्मानाने आदरपूर्वक डी.जी.तांदळेचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत सर्वांनी मनःपूर्वक भरभरून हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा 70 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डी.जी.तांदळेनी आपल्या मनोगत द्वारे ॲड.नितीन वाघमारे, मातोश्री विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नागरगोजे, कृषी विभागाचे बाबासाहेब कोकाटे ,पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ, शिक्षक एस.एम. चौरे ,मुकरमजान पठाण, नगर परिषदचे सदस्य फारूक सय्यद,आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, इंटक काँग्रेस कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, डॉ. लक्ष्मण पवळ, आज तकचे पत्रकार शेख इम्रोज आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब जायभाये,शिवाजी भारती, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी चौधरी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष चाटे ,जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक अनिल जाधवर, समाजसेवक मुकरमजान पठाण, परवेज भाई कुरेशी,पत्रकार शेख इब्रोंज आदींना मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अनिल बारगजे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीड शहर बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायभाये होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिव्हाळा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य, सूत्रसंचालन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जिव्हाळा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी मानले.शेवटी जिव्हाळा केंद्रातील सर्व बेघरांना डी.जी.तांदळे सरांच्या वतीने काळजीवाहक व्यवस्थापिका छाया सरोदे यांनी भोजन दिले. कार्यक्रमात जीव्हाळा केंद्रातील निराधार,बेघर लाभार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
Comments
Post a Comment