शिरुर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी, कर्जदार बंधुचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने लावलेले होल्ड शिवसेना स्टाईलने काढले

शिरुर कासार तालुक्यातील सर्व शेतकरी, कर्जदार बंधुचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेने लावलेले होल्ड शिवसेना स्टाईलने काढले- शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर/शिवसेना तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे

आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :  
        शिरुर कासार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्याला स्टेट बँक ऑफ इंडियाने होल्ड लावला होता . या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आसे वचन पण दिले होते . परंतु या सरकारणे शेतकऱ्यांना कर्जमाफी तर सोडाच उलट शेतकऱ्यांनाच भिकेला लावलं . भाजप ,शिंदेसेना आणि राष्ट्रवादी आजितदादा या पक्षाने जाहिरनाम्यात सांगितले होते, की आम्हि निवडुन आलो तर महाराष्ट्रातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी देऊ , परंतु या पक्षाच्या नेत्याने कर्ज माफी तर सोडाच शेतकऱ्यांच्या खात्यावर आसलेले १०/२० हाजार सुध्दा बॅंकेत कसे राहातील याची व्यवस्था होल्ड लाऊन आहे..म्हणुन जर शेतकरी आडचणीत आणला आसेल तर त्याला जबाबदार हे दळभद्री सरकार , त्यांचे नेते पालक मंत्री, आमदार , खासदार आहेत . म्हणुनच आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर , शिवसेना तालुका प्रमुख सोपान मोरे यांच्या पुढाकाराने स्टेट बँकेच्या शाखा आधिकांऱ्या सांगुन शिवसेना स्टाईलने होल्ड काढले . या प्रसंगी जिल्हा संघटक राजेश कोकणे.एसीबीआय चे तालुका प्रमुख संदिप जायभाये. जगताप.नामदेव आघाव.सारंग बडे.रमेश वाघ.संतोष केदार.राजेंद्र खेडकर.रियाज शेख आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते . स्टेट बॅंकेच्या शाखा आधिकांऱ्याशि चार्चा करुन त्यांना निवेदन देऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला बॅंकेचा होल्ड काढायला लावला असून , जर एखाद्या शेतकऱ्यांचा होल्ड निघला नशेल तर त्यांने बॅंकेत पासबुक घेऊन येणे साहेबांना सांगने , अडचण आली तर ९८ २३ ९६ ११ १० किवा ९६ २३ ७० ४७ ९० या नंबर वरती संपर्क करणे , आसे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर/तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी