प्रा. जालिंदर चंदनशिव सर यांना ' द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा ' राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक प्रा. जालिंदर चंदनशिव सर यांना ' द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा ' राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
३० जुलै रोजी पुरस्काराने सन्मानित होणार
आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत सहशिक्षक प्रा. श्री.जालिंदर चंदनशिव सर यांना 'द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा' महाराष्ट्र राज्य २०२५ चा राज्यस्तरीय ' आदर्श शिक्षक ' पुरस्कार जाहीर करण्यात आला .
हा पुरस्कार सामाजिक /शैक्षणिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबाबत 'द युवा ग्रामीण पत्रकार संघ ' महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराने प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा ३० जुलै २०२५ रोजी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे . तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा , अशी विनंती प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना पुरस्कार निवडपत्रा मध्ये केली आहे .
प्राध्यापक जालिंदर चंदनशिव सर यांना 'द युवा ग्रामीण पत्रकार संघ ' महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल( अण्णा) , संस्थेचे अध्यक्ष अब्दुल भाई सय्यद , महाविद्यालयातील सहशिक्षक , प्राध्यापक /सामाजिक /शैक्षणिक आदी क्षेत्र व सर्व स्तरातील नागरिक, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे .
Comments
Post a Comment