श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा हनुमानवाडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा


पाटोदा (प्रतिनिधी)
हनुमानवाडी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात, भक्ति भावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव तसेच परिसरातील सावता भक्तांनी एकत्र येत हा सोहळा सामूहिक एकतेच्या आणि श्रद्धेच्या भावनेने साजरा केला.या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात सकाळी मंगल वाजण्याच्या गजरात सावता महाराज यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीने करण्यात आली. टाळ, मृदुंग, झांज यांच्या गजरात व भक्तीमय गीतांच्या निनादात मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. भक्तांनी फुलांनी सजवलेली पालखी खांद्यावर घेत अत्यंत भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीनंतर सावता महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन अशा अध्यात्मिक वातावरणाने परिसर भक्तिमय झाला होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत टाळकरी म्हणून उत्सवात सहभाग घेत भक्तीचा जागर केला. या कार्यक्रमात सावता महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित कीर्तनांनी उपस्थितांची मने भारावून टाकली.दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावकऱ्यांसह आलेल्या पाहुण्यांना आणि भाविकांना प्रेमपूर्वक महाप्रसाद दिला गेला. मोठ्या प्रमाणावर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा म्हणजे गावातील एकतेचे, भक्तीचे व सांस्कृतिक वारशाचे प्रतिक ठरला.संत सावता महाराज हे पांडुरंग भक्तीचे प्रतीक होते. त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने श्रम, भक्ती व समाजसेवेचे मूल्य शिकावे, असा संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला. सावता महाराजांप्रमाणेच येथे भक्तगणही पांडुरंग व सावता महाराजांवर अनन्य श्रद्धा ठेवून दरवर्षी हा सोहळा साजरा करतात.या उत्सवाचे यशस्वी आयोजन सावता सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष ठकसेन तुपे, ह.भ.प. नागनाथ महाराज काळे, विजय तुपे, भाऊसाहेब त्रिंबक तुपे, भिवसेन तुपे, गोरक्ष तुपे, भागवत तुपे, भाऊसाहेब बाळू तुपे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर जाधव, दत्तात्रय जाधव, मच्छींद्र तुपे, गणेश जाधव, बाबादेव वनवे, माणिक वनवे, किसनदेव वनवे, अंबादास वनवे तसेच सर्व परिसरातील टाळकरी महिला व पुरुष मंडळी यांच्या सहकार्याने पार पडला. कार्यक्रमाचेक्ष शिस्तबद्ध आणि भव्य आयोजन पाहून उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले. या उत्सवामुळे गावात भक्ती, एकात्मता आणि अध्यात्मिकता यांची एक सुंदर भावना निर्माण झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी