पाटोदा नगरपंचायतच्या कारभारावर मुस्लिम समाज नाराज: मुस्लिम समाज बांधवाच्या कब्रस्तानमध्ये सर्वत्र अंधार


पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरातील मुस्लिम समाजाला नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असून, येथील मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः, कब्रस्तानमध्ये प्रकाशाची (लाईटची) सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार आणि इतर धार्मिक विधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या भेडसावत असतानाही पाटोदा नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुस्लिम समाजातील नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या लोकांना अंधारामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आणि उपस्थित असलेल्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे."कब्रस्तान हे आमच्यासाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. प्रकाशा अभावी आम्हाला अनेक अडचणी येत आहेत," असे एका स्थानिक मुस्लिम नागरिकाने सांगितले.या गंभीर समस्येकडे पाटोदा नगरपंचायतीने तात्काळ लक्ष घालून कब्रस्तानमध्ये लवकरात लवकर प्रकाशाची सोय करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी