शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस संपन्न
महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्गातील गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
बीड प्रतिनिधी- बीड शहरात व परिसरात वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचणालंयच्या वतीने 39 वाचनालेय सुरू करण्यात आले आहेत. सतत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून विविध उपक्रम राबवण्यात येतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वाचन संस्कृती वाढवण्याकरता विद्यार्थ्यांना वाचण्याकरता 50 ते 100 पुस्तकांचा संच प्रत्येक केंद्रात दिला जातो. गरजू व होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्य ( पेन, वही, कंपास) देऊन, "पे बॅक टू सोसायटी" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुमोल उपदेश लक्षात ठेवून समाज ऋण फेडण्याचे अल्पसे कार्य केल्या जाते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महामानव अभिवादन ग्रुप बीड संचलित मोफत शिकवणी वर्ग राजगृह बुद्ध विहार जुना मोंढा रोड बीड येथे वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी.वानखेडे यांनी त्याचं नातू तनय अनिल वानखेडे यांचा वाढदिवस जो की (आय.आय.एस.टी.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी) तिरुवअनंतपुरम केरळ येथे शिकत आहे.
त्याचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत संपन्न करून 23 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन )व प्रधान प्रणव सोहम ससाने, यश जावळे, रुद्र धनवे, अनुष्का धनवे,प्राची नरवडे, नंदिनी धनवे, सिया घोडके, आशा आठ गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी एस.एस.सोनवणे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक एल.आय.सी. यु.एस.वाघमारे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख ए. एल.अवसरमोल लाभले होते. महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले, समता सैनिक दलाचे मेजर कॅप्टन राजाभाऊ आठवले,के येस. वाघमारे व संघमित्रा वाघमारे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. आदर्शना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आठवले यांनी तर सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. प्रस्ताविकासत कॅप्टन आठवले म्हणाले की मोफत शिकवणी वर्गातील 3 ते 4 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत गेले तर अभिवादन ग्रुपच्या कष्टाचे चीज झाले असे समजण्यात येईल या करिता अभिवादन ग्रुप सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. प्रमुख पाहुणे मोफत शिकवणी वर्गाचे शिक्षक रविद्र टेकाळे विध्यार्थीच्या प्रगती करीता घेत आसलेल्या कष्टा बददल मान्यावराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यु.एस.वाघमारे, के.स.वाघमारे अत्यंत सोप्या भाषेत यांनी समजावून सांगून, "बालकांनो तुम्ही भाग्यवान आहात" की तुम्हाला मार्गदर्शन व मदत करण्याकरता 20 व्या शतकातील 6 दशकात शिकलेले वयस्कर उपस्थित आहेत. आच्या वेळी आम्हाला मार्गदर्शन करायला कोणीही नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच शिक्षण प्राप्त करून स्वहिता बरोबरच आपल्या आई-वडिलांचे कष्ट कधीही न विसरता त्यांचे ऋण व समाजऋण फेडण्याचा विचार सतत डोळ्यासमोर ठेवावा. असे अनेक उदाहरणाद्वारे समजून सांगितले. आध्याक्षीय समारोपात सोनवणे एस.एस.म्हणाले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत शिक्षणातून ज्ञान प्राप्त करावे त्याला शिलाची व वैज्ञानिक जोड देऊन पुढील जीवन जगण्यास तत्पर राहान्याचे ध्येय हे स्पष्ट केले. सर्वच उपस्थितानी तनय वानखेडे यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देऊन पुढील जीवनाकरता मंगल कामना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन डी.जी. वानखेडे यांनी व्यक्त करून प्रा डॉ. नामदेव सिनगारे प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड हे देखील आपल्या मुलींचे वाढदिवस अशाच पद्धतीने साजरे करत असे सांगितलं व त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमला बहुसंख्य पालकांनी विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment