प्राचार्य डी.जी.तांदळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



 बीड प्रतिनिधी - बीड शहर बचाव मंच परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डी.जी. तांदळे सर (दादा) यांचा 70 वा वाढदिवस बीड शहर बचाव मंचच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील यशस्वीपणे कार्य करणाऱ्या मान्यवरांकडून मोठ्या उत्साहाने शहरातील राजाभाऊ वंजारे, छायाताई सरोदे, अभिजीत वैद्य संचलित 'जिव्हाळा' बेघर निवारा केंद्र परिवारासमवेत साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सोबत काम करताना आलेले अनुभव व जुन्या नव्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डी.जी. दादांनी आयुष्यभर केलेल्या कार्यावर सर्वांनी प्रकाशझोत टाकून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच त्यांच्या उदंड आयुष्याची ईश्वरचरणी कामना केली. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी मोठ्या सन्मानाने आदरपूर्वक सत्कार करत डी.जी. दादांना मनःपूर्वक भरभरून हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा 70 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. कॉम्रेड नामदेव चव्हाण, राजकुमार कदम,
 बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये, पत्रकार बालाजी जगतकर, व जेष्ठ समाजसेवक मुकरमजानभाई पठाण, मंचचे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिलजी बारगजे, ॲड. नितीनजी वाघमारे, (इस्लामपुरा) माजी नगरसेवक फारूक सय्यद, आ.प.चे जि. अ.अशोकराव येडे, इंटक काँग्रेसचे जि. अ. रामधनभाऊ जमाले, सेवानिवृत्ती पीएसआय बाबासाहेब जायभाये, वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ, कृषी विभागाचे बाबासाहेब कोकाटे, मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. नागरगोजे, सेवानिवृत्त चौरे सर, सिटी हॉटेल ग्रुपचे परवेज कुरेशी, आप तक न्यूज चॅनलचे संचालक इमरोज भाई शेख ,गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ काटे आदी मान्यवर शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी