नाशिक येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची किस्किंदा पाचाळ यांनी घेतली सदिच्छा भेट
बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा
नाशिक – (दि. १३ जुलै २०२५)
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. छगनराव भुजबळ साहेब यांची नाशिक येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भेटीदरम्यान मान्यवरांना हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष तसेच झाशीची राणी सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे,
अर्चनाताई बलकवडे,संध्या सोनवणे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वंदनाताई खांडेभराड,खडसेताई,सविता कांबळे
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment