बीड शहरात बोगस, निकृष्ट दर्जाचे सोलार पोल व हायमास्ट दिवे बसवलेल्या कामाचे बिल देऊ नये - अक्षय कोकाटे
बीड प्रतिनिधी - सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान व दलित वस्ती योजने मधुन शहरात बसविण्यात येणाऱ्या सोलार पोल हायमास्ट-दिवे बसविणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे सामान वापरुन साहित्य खरेदीत भष्ट्राचार करणाऱ्या एजन्सीचे देयक थांबवा असे लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी त्यांना निवेदनाद्वारे रिपाई चे नेते अक्षय कोकाटे यांनी मागणी केली आहे.
- बीड न.प. च्या वतीने नगरोत्थान महाअभियानातंतर्गत व दलित वस्ती अंतर्गत बीड शहरात सोलार पोल हायमास्ट दिवे शहरात बसविण्यात येत आहेत. सदरील कामास 5 कोटी 25 लाख 43 हजार रुपयाची मान्यता देण्यात आलेली आहे. व दलीत वस्ती मधील 6 प्रभागात सोलार पोल हायमास्ट दिवे व विद्युत साहित्य बसविण्याची 1 कोटी रुपयाची मान्यता दिलेली आहे.य मा. मुख्याधिकारी न.प.बीड व न.प. अभियंता उदय ई-पिल्ले यांच्या संबंधित मोहीनीराज कन्स्ट्रक्शन व संदिप इलेक्ट्रीकल्स यांच्या एजन्सीकडून 1 कोटी रुपायाचे सोलार पोल व हायमास्ट बसविण्याचे काम करण्यात आलेले आहे. नगरोत्थान अभियानातुन 5 कोटी 25 लाख 43 हजार रुपयाचे काम साबेर कन्स्ट्रक्शन पाटोदा यांच्याकडून करण्यात आलेले आहे. सदरील कामातील दलित वस्ती अंतर्गत बसविण्यात आलेले सोलार पोलची किमत 70 ते 75 हजार
असर्ताना या सोलार पोलची किमत 2 लाख 21 हजार 98 रु. दाखविण्यात आलेली आहे. नगरोत्थान अभियाना अंतर्गत साबेर कन्स्ट्रक्शन पाटोदा यांच्याकडून बीड शहरात बसविण्यात आलेल्या सोलार पोलची किमत 60 ते 65 हजार रुपये असून त्याची किंमत 2 लाख 3 हजार 800 रु. इतकी दाखविण्यात आलेली आहे. सदरील साहित्य ISI मार्क असलेल्या कंपनीची साहित्य न वापरता चायना कंपनीचे साहित्य ज्याला मान्यता नाही असे वापरले आहे. काम करणाऱ्या दोन्ही एजन्सी कडून भष्ट्राचार करण्यात आला असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरुन न.प. मुख्याधिकारी बीड यांच्या संगनमताने करण्यात आला आहे. या भष्ट्राचार प्रकरणी काम करणाऱ्या संबंधित एजन्सीची चौकशी करण्यात यावी या करीता दि. 28 फेब्रुवारी 2025 ते 13 मार्च 2025 रोजी चौकाशी करुन त्याचे देयक थांबविण्यात यावे. या करीता निवेदन देण्यात आले होते. संबंधिताची चौकशी न करता त्याचे देयक देण्यात आले आहेत. यामध्ये बीड न.प.सी.ओ नीता अंधारे, अभियंता व एजन्सीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment