बहुजन शिक्षक संघटनेचे बीड शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या सोबत बैठक
बीड प्रतिनिधी - बीड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यात असणाऱ्या शिक्षकांच्या विविध विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन देण्यात आले सदर बैठक ही शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी यांनी बैठकीस खालील विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये राज्याध्यक्ष विजयकुमार समुद्रे ,उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे , राज्य सचिव विनोद कुमार कांबळे,शिक्षक नेते शेख मुसा विभागीय अध्यक्ष बबनराव पंडित, निवेदक महादेव इनकर सहभागी होते.शिक्षकांची विविध प्रसून है ऑनलाईन फाईलनेच सादर करुन मंजूर करावीत व शिक्षकांना त्या संचिकेचे क्रमांक घ्यावा. जेणेकरुन त्या शिक्षकांना आपले प्रकरण कुठपर्यंत आले आहे व कोणत्या टेबलला थांबले आहे हे पाहता येईल. शिक्षकांचे नियमित वेतन हे तारखेला शासन निर्णयानुसार होणे अपेक्षित आहे. ज्या महिन्यामध्ये बजेट लवकर येऊनही शिक्षण विभाग, वित्त विभाग, अधिकारी, कर्मचारी हे जाणीवपूर्वक विलंब लावतात व शिक्षकांचे वेतन हे शासन निर्णयानुसार गेली अनेक वर्षापासून होत नाहीत याचा आढावा घेऊन विलंबास जवाबदार असणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी. संच मान्यता 2024-25 नुसार शिक्षकांचे अगोदर समायोजन करुन बदल्या होणे अपेक्षित असतानाही अतिरिक्त पदावर शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून या प्रकरणी शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन उचित कार्यवाही करावी, शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख यांची प्राथमिक पदवीधराची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करुन पदोन्नती (दर्जावाढ) सेवाजेष्ठतेप्रमाणे देण्यात यावी. शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधरासाठी पदोत्रती प्रक्रिया राबविण्यात यावी. प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे विकल्प घेऊन विषय बदल करण्यात यावा.12 वर्षे व 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड वेतनश्रेणीचे लाभ देतांना ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ट शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे.
वरील सर्व विषयावर भगवानराव फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सारा वार चर्चा करून प्रत्येक प्रश्न तात्काळ निकाली काढल्या जाईल अशी आश्वासन दिले आणि कार्यालयामध्ये झिरो पेंडन्सी कशी आणता येईल यावरती आम्ही विशेष प्रयत्न करू व शिक्षकांना न्याय देण्याचे काम करू असे सांगितले प्रसंगी बैठकीमध्ये राज्याध्यक्ष विजयकुमार समुद्रे ,उपशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे , राज्य सचिव विनोद कुमार कांबळे , शिक्षक नेते शेख मुसा विभागीय अध्यक्ष बबनराव पंडित, निवेदक महादेव इनकर , श्याम कुमार फटाले ' अमर सारडा, रिजवान नूर अनिल शिंदे सर सहभागी होते .
Comments
Post a Comment