राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व आ.धनंजय मुंडे यांची शेख निजाम यांच्या घरी स्नेहभोजन व सदिच्छा भेट
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब व आ.धनंजय मुंढे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला व बीड शहरातील विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन दिले
बीड प्रतिनिधी निर्धार नव्या पर्वाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील जी तटकरे साहेब, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपालीताई चाकणकर आमदार विजयसिंह पंडित प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण राष्ट्रीय प्रवक्ते परांजपे,कल्याण काका आखाडे,आ.विक्रमजी काळे,मा.आ.संजयजी दौंड,रमेशराव आडसकर, आदी मान्यवर बीड नगरीमध्ये आलेले होते सदरील आलेल्या मान्यवरांच्या स्नेहभोजनाचे आयोजन शेख निजाम व शेख अमर परिवार व मित्र मंडळातर्फे करण्यात आले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील जी तटकरे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला व बीड शहरातील अल्पसंख्यांक बहुल भागातील अद्याप प्रलंबित प्रश्न संदर्भात असलेल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या वस्तीग्रह, उर्दू घर, नवीन ईदगाह बालेपिर या ठिकाणी जाण्यासाठी काँक्रेट रस्ता व ईदगाह च्या ठिकाणी काँक्रिटीकरण, बिंदुसरा पात्रातील जागा पेठ बीड विभागातील ईदगासाठी द्यावी, जुना बाजार वेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत रस्ता, बीड शहरातील प्रमुख मोठे नाले ज्यात सेंटरनाला भाजी मंडई ते बिंदुसरा नदी, इस्लामपूरा, मोमीनपुरा,गांधीनगर,मिल्लत नगर, मोहम्मदीया कॉलणी,बिलाल नगर या सर्व परिसरातील रस्ते व नाली बनवणे तसेच कंकालेश्वर मंदिर व दर्गा परिसरातील नाला , बाले पीर भागातील बांगर नाला बनवणे, बिंदुसरा नदीचे नरिमन पॉईंट धरतीवर विकास करून उद्योग व्यवसायास चालना द्यावी या संदर्भातील मागण्या प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब व आ.धनंजय मुंढे साहेब,आ.विजयसिंह पंडित यांच्याकडे करण्यात आल्या या मागण्या संदर्भात माननीय तटकरे साहेबांनी मागण्यांचे सकारात्मक चर्चा करून आदरणीय अजित दादांच्या माध्यमातून सदरील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत शेख निजाम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन ,खय्युम इनामदार ,सत्तार इनामदार ,शेख खदीर , सय्यद आजम, शेख जाकीर ,शेख नसिर, मोमीन जुबेर, आदींनी केले
Comments
Post a Comment