संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी राज्यव्यापी आंदोलन
बोधगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे - अर्जुन जवंजाळ, अनिल डोळस बीड प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकाच दिवशी म्हणजेच बुधवार - 12 मार्च 2025 | राज्यव्यापी आंदोलन बौध्द गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देऊन कायद्यात बदल करण्यात यावा या मागणीसाठी होत आहे. त्यानुसार बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 12/03/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता आंदोलन, निदर्शने करण्यात येणार आहे.तरी आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून सर्वांनी एकत्र येऊन पायी जिल्हाधिकारी कार्यावर जायचे आहे. वेळेवर येऊन आंदोलनात सहभागी व्हावे चे आवाहन अर्जुन जवंजाळ,अनिल डोळस यांनी केले आहे. तरी मोठ्या संख्येने व जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे कळवण्यात आली आहे.