शिवसेनेचा सामुदायिक विवाह सोहळा सामाजिक न्याय मंत्री ना. संजयजी सिरसाठ यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये संपन्न होणार- संतोष चौधरी
परळी (प्रतिनिधी): शिवसेना आयोजित हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, छत्रपती संभाजी नगर चे पालक मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते ना. संजयजी सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना दिली आहे.
दिनांक २ एप्रिल वार बुधवार रोजी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ६ वाजता मोंढा मैदान मारोती मंदिर समोर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ५ या वेळेत सावता माळी मंदिर येथे भोजन व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी अन् वधू वराना आशीर्वाद देण्यासाठी मोंढा मैदान येथे उपस्थीत रहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment