पारंपरिक शेती ऐवजी फुलशेती करत मुळुकवाडी येथील शेतकरी चंद्रसेन ढास यांनी फुलवला समृद्धीचा मळा


लिंबागणेश:- ( दि.३१) बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी चंद्रसेन शेषेराव ढास या शेतकरी कुटुंबाने पारंपरिक पिकांऐवजी फुलाची शेती करत समृद्धीचा मळा फुलवला आहे. साधारणतः १००० लोकसंख्या असलेल्या मुळुकवाडी गावातील शेतकरी प्रामुख्याने कांदा पिक घेतात.संपुर्ण लिंबागणेश पंचक्रोशीत एकमेव फुलशेती करणारे शेतकरी म्हणून चंद्रसेन ढास यांची ओळख आहे.१२ वर्षांपूर्वी मुळुकवाडी येथील १० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गुलाब फुलांची गटशेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केवळ चंद्रसेन ढास यांनीच फुलशेती व्यावसाय तग धरून जिद्दीने करत आहेत. सकाळी उठून कळी तोडली तरच २ दिवस ती टिकते त्यामुळे यासाठी घरचे मजुर असणे गरजेचे आहे. चंद्रसेन ढास यांना ५ एक्कर शेती असुन त्यापैकी ३ एक्कर शेतात फुलशेती करतात. फुलांना योग्य दर मिळण्यासाठी लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजे पाणी टंचाईच्या काळात करावी लागते.पावसाळा सुरू असताना उत्पादन निघण्यास सुरूवात होत असल्याने अनेकदा कमी जास्त पावसाचा फटका फुलशेतीस बसतो मात्र अस्मानी सुलतानीचा विचार न करता जोखीम पत्करून फुलशेती करतात. फुलांना श्रावणात, गणेशोत्सवात तसेच नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर मागणी असते.फुलांचे बाजारभाव स्थिर नसतात. गुलाब,गलांडा, गुलछडी,बिजली,अश्टर,झेंडु, शेवंती आद फुलांचे उत्पादन करण्यात येते. बीड,केज, पाटोदा याठिकाणी फुले विक्रीसाठी पाठवली जातात.चंद्रसेन ढास यांच्या पत्नी सविता ढास,मुलगा प्रणव ढास,अथर्व ढास फुलशेतीत मदत करतात. मोठा मुलगा प्रणव ढास यांने पुणे येथे इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स केलेला आहे तर अर्थव शिक्षण घेत आहे. लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकरी फुल सेंटर प्रसिद्ध असुन धार्मिक,लग्न समारंभ, वाढदिवस विविध कार्यक्रमांसाठी आवश्यक हारांसाठी चंद्रसेन ढास यांच्याकडे मागणी असते.

कृषी विभागाची अनास्था ; आपल्या भागात फुलशेती नाही म्हणत कृषी विभागाने दोनदा दाखल केलेली फाईल रद्दबातल केली :- चंद्रसेन ढास 

शेतकऱ्यांना फुलशेती मध्ये चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.शेतक-यांनी योजनेचा लाभ घेऊन फुलशेती मध्ये प्रगती करावी यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग,वनपिके, मसाला पिके व फुलशेती आदींसाठी १ वर्षं ते ३ वर्षं अनुदान तत्वावर शासकीय योजना कार्यान्वित आहे.मात्र बीड कृषी विभागाची अनास्था यास कारणीभूत असुन दोन वेळा केलेली फाईल त्यांनी आपल्या भागात फुलशेती नसल्याने नाकारली असल्याची खंत चंद्रसेन ढास यांनी बोलून दाखवली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी