ज्ञानज्योती बहुऊदेशी राष्ट्रीय प्राध्यापक डॉ.सोपान सुरवसे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
बीड प्रतिनिधी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा मराठी भाषा संशोधन व संवर्धन अध्यापन कार्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2025 सन्मानपूर्वक प्राध्यापक डॉ.सोपान सुरवसे यांना प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून रेखाताई भंडारे , मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्ष प्रा डॉक्टर केशव देशमुख, स्वागत अध्यक्ष माननीय पोपटराव पठारे व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हेमंत भोसले यांच्या उपस्तित देण्यात आला. प्रा डॉ सोपान माणिकराव सुरवसे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ सुरेंद्र अलुरकर, मा. डॉ हेमंत वैद्य, कार्यवाह भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल अध्यक्ष.मा. डॉ पुरुषोत्तम कुलकर्णी, स्थानिक कार्यवाह डॉ अविनाश देशपांडे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष.मा.प्रा.चंद्रकांत मुळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ सुहास मोराळे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ उत्तम साळवे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment