आष्टी तालुक्यातील जामगांव येथील मातंग समाजातील धनु रणसिंग ची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी-किशन तांगडे
रात्री 10:30 वाजता जामगांव येथे जाऊन किशन तांगडे यांनी अन्यायग्रस्त कुठूबाची भेट घेऊन सांत्वन केले.
बीड -प्रतिनिधी :--- जामगांव,ता.आष्टी,जी.बीड येथील मातंग समाजातील धनु दामू रणसिंग हा आपल्या पत्नी सोबत गावातीलच वीट भट्टी वर कामगार म्हणून काम करून आपली व आपल्या कुठूबाची उपजीविका भागवून मजूर म्हणून काम करीत होता.
वीट भट्टी मालकाने त्याला उचल म्हणून तीस हजार रुपये दिले होते.
या उचल म्हणून दिलेल्या पैशावर गावातीलच गुंड प्रवृत्तीच्या दोघांचा डोळा होता,त्या दोघांनी(आरोपीने)धनु रणसिंग च्या कडील तीस हजार रुपये बळजबरी करून हिसाकावून त्याची जातीय द्वेषातुन/मानसिकतेतून हत्या(खून)केली.
सदरील हत्या पुरोगामी महाराष्ट्राला हदरून सोडणारी आहे.
गोर-गरीब,दिन-दलित,मागासवर्गीया वर सातत्याने होणारे हल्ले,अन्याय,अत्याचार,दहशत आणि खून या सारख्या होणाऱ्या घटना कधी संपतील असा संतप्त सवाल किशन तांगडे यांनी उपस्थित केला.
मातंग समाजातील धनु रणसिंग याची हत्या झाल्या नंतर किशन तांगडे यांनी रात्री 10:30 वाजता जामगांव,ता.आष्टी,जी.बीड येथे जाऊन पीडित कुठूबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
यावेळी बीड जिल्हाचे सामाजिक न्याय विभागाचे कर्तव्यदक्ष आयुक्त प्रदीप भोगले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
या घटनेचे गांभीर्य ओळखून किशन तांगडे यांनी आष्टी चे कर्तव्यदक्ष DYSP बाळकृष्ण हनपुडे पाटील साहेब यांच्या सोबत चर्चा केली.
यावेळी मयत धनु रनसिंग ची पत्नी इंदुबाई,मुलगा आदित्य चार मुली मनीषा,ज्योती,स्वाती,शीतल यांच्या सह मयत धनु रनसिंग ची आई इत्यादी सह नातेवाईक उपस्थित होते.
Comments
Post a Comment