बीड शहरातील व्यापरांकडून सक्तीने वसुली करू नये-भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे
बीड प्रतिनिधी.
बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून सक्तीने वसुली करू नये असे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड नगरपालिके मार्फत बीड शहरातील व ग्रामीण भागातील फळविक्रेते भाजीपाला विक्रेते शेळी मेंढी कोंबड्या इत्यादी विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वसुली करत दरवर्षी बीड नगरपालिके मार्फत टेंडर काढले जातात यावर्षी 15 मार्च रोजी टेंडरची मुदत संपलेली आहे याबाबत संबंधित गुत्तेदार व्यापाऱ्याकडून व शेतकरी बांधवांकडून सक्तीने वसुली करत आहे मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांनी स्वतः या विषयाचा फॉलोअप घेऊन जातीने लक्ष घालून ही केली जाणारी वसुलीवर तात्काळ प्रतिबंधक उपाय म्हणून शोधावेत आणि वसुली करण्यास निर्बंध लावावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगरपालिकेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे गोरगरीब व्यापाऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर आपण स्वतः नगर परिषदेचा चाललेला हा सावळा गोंधळ हा आपण बंद केल्याशिवाय आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे देखील प्रसिद्धी पत्रकात नवनाथ अण्णा यांनी म्हटले आहे आता या वरील महत्वाच्या विषयावर नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निता अंधारे मॅडम यांनी तात्काळ लक्ष देऊन नेमके काय चालले आहे हे स्वतः पाहावे आणि या व्यापाऱ्यांवर होणार अन्याय थांबवावा आणि आणि गोरगरीब व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे सर्व बीड शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे .
Comments
Post a Comment